Monday, July 1, 2024

फिट अँड फाईन! सारा अन् जान्हवीने लुटला मालदीवचा आनंद; एकत्रच केला वर्कआऊट

सद्या महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास सुद्धा बंदी आहे. त्यामुळे आता घरी बसून काय करायचे? हाच विचार करत अनेक कलाकार मुंबईला बाय बाय म्हणत वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. काही कलाकार आपल्या घरी जाऊन घरच्यांसोबत वेळ घालवण्यास पसंती देत आहेत, तर काही कलाकार मात्र या सुट्टीचा फायदा घेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धमाल करताना दिसत आहेत.

बहुतेक कलाकारांनी मालदीव याच ठिकाणाला जास्त पसंती दिल्याचे दिसत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीने नुकतीच मालदीवला हजेरी लावली आहे, तर जान्हवी कपूर यापूर्वी मालदीवमध्ये पोहोचली होती. सारा अली खान देखील २ दिवसांपूर्वी तिथे पोहोचली आहे. खास गोष्ट म्हणजे दोघेही एकाच रिसॉर्टमध्ये सुट्ट्या घालवत आहेत, आणि एकत्र खूप वेळ घालवत आहेत.

सारा अली खान आणि जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघांची फॅन फॉलोविंग खूप चांगली आहे, चाहत्यांसाठी ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियामधून सामायिक करतात. मंगळवारी सारा अली खानने स्वत: चा आणि जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेत्री एकत्र वर्कआउट करताना दिसत होत्या, तर त्यांचे वर्कआउट प्रशिक्षक नम्रता पुरोहित त्यांच्या वर्कआऊटकडे लक्ष देत होत्या.

सारा अली खाननेही इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘प्रवाहासह, स्थिर आणि हळू, पायाने उंच किक मारा. अशाप्रकारे तुम्हाला सोनेरी चमक मिळेल.’ व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेत्री बैठका मारताना दिसत आहेत. व्यायाम करताना गायक जस्टिन बीबरची गाणीही बॅकग्राऊंडला ऐकली जात आहेत. या दोन्हींचे चाहते या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. या व्हिडिओला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सारा अली खान शेवटची अभिनेता वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती अखेर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रूही’ चित्रपटात अभिनेता राज कुमार राव आणि वरुण शर्मासोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रजऊ के पढ़ाईब’ नंतर प्रमोद प्रेमीच्या ‘चईत के टेम्परेचर’ गाण्यानेही गाठला मोठ्या व्ह्यूजचा टप्पा!

-कमालच! भोजपुरी स्टार ऋचा दीक्षित आणि प्रवेश लालने केला ‘काली नागिन के जैसी…’ गाण्यावर रोमान्स

-कोरोनामुळे स्टेज शो न करणाऱ्या खेसारी लाल यादवच्या गाण्याचा नवा विक्रम, दोन दिवसांतच मिळाले २० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा