भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार खेसारी लाल यादव हा सध्या भोजपुरी प्रेक्षकांमध्ये धमाल करत आहे. त्याची सुपरहिट गाणी सतत एकामागून एक रिलीझ होत आहेत. ही सगळी गाणी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. खेसारीच्या फॅन फॉलोविंगचा परिणाम असा होतो की, गाणी रिलीझ होताच व्हायरल होऊ लागतात.
नुकतेच खेसारी लाल यादवचे ‘सेनुरवा ए जान अलगा करा दी’ हे गाणे रिलीझ झाले आहे, जे भोजपुरी प्रेक्षकांमध्ये बम्पर हिट आहे. हे गाणे १० एप्रिल रोजी टीम फिल्म्स भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर रिलीझ करण्यात आले होते. या गाण्यालाही भोजपुरी प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला दोन दिवसातच २० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले होते. परंतु आतापर्यंत या गाण्याला ३७ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या खाली चाहते कमेंट्स करून, गाण्याचे आणि खेसारीलालचे कौतुक करत आहेत.
खेसारीलाल यादवच्या या सुपरहिट गाण्याला स्वतः खेसारीलालने गायले आहे. विष्णू विशी यांनी हे गीत लिहिले आहे, तर रोशन हेगडे यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गोल्डी आणि बॉबी यांनी केले असून, गाण्याचे व्हिडिओ दिग्दर्शक आशिष विद्यार्थी आहेत. याशिवाय गाण्याचे एडिटर प्रांजल सिंग आहे.
कोरोना साथीच्या रोगामुळे, खेसारी लाल यादव आजकाल कोणताही स्टेज शो करत नाही. परंतु तो सतत नवनवीन गाणे रिलीझ केल्यामुळे चर्चेत राहतो. त्याची गाणी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. म्हणून प्रेक्षकांकडून गाण्याला नेहमी प्रेम मिळते. एक गाणे हिट होत नाही, तोपर्यंत चाहते त्याच्या दुसऱ्या गाण्याची प्रतीक्षा करू लागतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा
-थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करत अनुष्काने सांगितल्या मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या आठवणी