बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक पार्श्वगायकांनी आपल्या कर्तुत्वावर यश मिळवले आहे. त्यातच शंकर महादेवन यांचेही नाव घेतले जाते. शंकर महादेवन बुधवारी त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा करीत आहेत.
शंकर महादेवन यांनी 2015 मध्ये अभिनेता म्हणून एका मराठी चित्रपटात काम केले आहे. शंकर महादेवन हे पार्श्वगायक आणि एक उत्तम संगीतकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत संगीतात चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
शंकर यांचा जन्म 3 मार्च 1967 रोजी झाला होता. मुंबईत जन्मलेले शंकर एका तमिळ कुटुंबातील आहेत. ते लहानपणी शास्त्रीय आणि कर्नाटक संगीत शिकले. शंकर, एहसान, लॉय या त्रिकूटाने संगीत उद्योगाला दोन सुपरहिट अल्बम दिले.
त्याचवेळी 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या मराठी चित्रपटात त्यांनी पंडित भानु शंकर शास्त्रीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेलाही चांगली पसंती मिळाली. एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले, की जेव्हा या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, तेव्हा कोणीतरी त्यांची गंमत करत आहे असे त्यांना वाटले.
शंकर महादेवनच्या ‘ब्रेथलेस’ गाण्यामुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली. तीन मिनिटांचे हे गाणे त्यांनी अक्षरशः श्वास रोखून गायले. ही अनोखी प्रतिभा पाहून लोक आश्चर्यचकित झाले. हेच ते गाणे होते ज्याने त्यांना एका रात्रीत सुपरस्टार बनविले.
वयाच्या पाचव्या वर्षी शंकर महादेवनने वीणा वाजवायला सुरुवात केली. यानंतर मराठी संगीतकार श्रीनावास खळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीत शिकले. 1998 साली त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. शंकर महादेवन यांना मराठी, तामिळ, हिंदी, उर्दू आणि इंग्रजीसारख्या विविध भाषांचे ज्ञान आहे.
शंकर यांचा मुलगा सिद्धार्थ देखील एक गायक आहे. 2013 मध्ये आलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाच्या ‘जिंदा’ या गाण्याने त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-