यूएसमधील शिक्षण सोडून श्रद्धाने धरली मुंबईची वाट, पहिलाच चित्रपट ठरला होता सुपरफ्लॉप, वाचा अभिनेत्रीचा अभिनयप्रवास

Actress Shraddha Kapoor Quitted Study To Become An Actress And Gave First Flop Film


बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री, आपल्या अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री, सर्वांना जिच्या एका झलकची आतुरता असते ती अभिनेत्री, म्हणजेच ‘श्रद्धा कपूर.’ श्रद्धाने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपले एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. आज असा एकही चाहता नसेल, ज्याला कदाचित श्रद्धा कपूर हे नाव माहिती नसेल. तिने बॉलिवूडला एकापेक्षा एक असे हिट सिनेमे दिले आहेत. आज (३ मार्च) ती आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आपण, तिने कशाप्रकारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग वाट कशाची पाहताय सुरुवात करुया…

लता मंगेशकर यांच्याशी जवळचे नाते
श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च, १९८७ रोजी मुंबई येथे झाला होता. तिला लहानपणापासूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. कारण सर्वांनाच माहिती आहे की, ती एक प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आहे. शक्ती कपूर हे पंजाबी, तर आई शिवांगी कोल्हापूरे ही मराठी आहे. तिच्या भावाचे नाव सिद्धांत कपूर असे आहे. याव्यतिरिक्त प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही तिची मावशी आहे. विशेष म्हणजे, श्रद्धाचे गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशीही जवळचे नाते आहे.

खरं तर श्रद्धा कपूरचे आजोबा म्हणजेच शक्ती कपूर यांचे वडील लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ होते. यानुसार लता मंगेशकर ही श्रद्धा कपूरची आजी आहे. दोघांमध्ये भन्नाट बाँडिंग आहे. तिने लता दीदींकडून गाण्याचे टिप्सही घेतल्या आहेत.

श्रद्धाने आपले शालेय शिक्षण बाई नरसी स्कूल, मुंबईमधून केले होते. तिने आपल्या पदवीपूर्व अभ्यासासाठी अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातही प्रवेश घेतला होता, परंतु तिने ते मध्येच सोडले होते आणि अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला होता. श्रद्धा कपूर एक चांगली अभिनेत्रीसोबतच एक उत्तम सिंगर आणि डान्सरही आहे. बालपणापासूनच तिने गाणे आणि कविताही लिहित आहे. सोबतच ती कला क्षेत्रातही आपला हात आजमावताना दिसते. तिला चांगली स्केचिंग आणि पेंटिंगही येते. विशेष म्हणजे श्रद्धा, टायगर श्रॉफ आणि अथिया शेट्टी हे तिघेही शाळकरी मित्र आहेत.

पहिले दोन चित्रपट फ्लॉप, परंतु तिसऱ्या चित्रपटात उजाडले भविष्य
श्रद्धाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात सन २०१० साली ‘तीन पत्ती’ या चित्रपटापासून केली होती. यामध्ये तिने ‘अपर्णा खन्ना’ची भूमिका साकारली होती. श्रद्धाला फेसबुकमार्फत एका मोठ्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, “एके दिवशी निर्माता अंबिका हिंदुजा यांनी माझे अनेक फोटो फेसबुकवर पाहिले होते आणि माझ्याशी संपर्क साधला होता.” अशाप्रकारे तिला ‘तीन पत्ती’ सिनेमा मिळाला होता. या चित्रपटा अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते. तरीही, हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि श्रद्धाला खास अशी ओळख मिळाली नाही.

त्यानंतर सन २०११ साली तिने ‘लव्ह का द एंड’ चित्रपटात काम केले. यामध्ये तिने कॉलेज विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला होता. तिला सलग २ वेळा मोठे धक्के बसले होते, परंतु ‘कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती’ असे म्हणतात ना, हे श्रद्धाच्या बाबतीत अगदी चपखलपणे बसतं. अखेर श्रद्धाचे भविष्य उजाडले ते सन २०१३ साली. यावर्षी तिने ‘आशिकी २’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने १०० कोटींपेक्षाही अधिक रुपयांची कमाई केली. यानंतर श्रद्धाने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘आशिकी २’मध्ये तिने गायिकेची भूमिका साकारली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूरही मुख्य भूमिकेत होता.

यानंतर श्रद्धाने सन २०१४ साली ‘एक व्हिलन’ चित्रपटात काम केले. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत होता. याचवर्षी ती अभिनेता शाहिद कपूरसोबत ‘हैदर’ या चित्रपटातही झळकली. यानंतर सन २०१५ मध्ये तिचा ‘एबीसीडी २’ चित्रपट रिलीझ झाला. या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर यश मिळाले. यामध्ये श्रद्धासोबत वरुण धवनही होता. या चित्रपटाने चांगले नाव कमावले.

श्रद्धाने सन २०१७ मध्ये पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनातील स्थान पक्के केले. याचवर्षी तिने अभिनेता अर्जुन कपूरसोबत ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील गाणीही भलतीच गाजली होती. यापूर्वी सन २०१६ मध्ये तिच्या ‘बाघी’ या चित्रपटाने चांगली प्रसिद्धी मिळवली. तिने टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करत रोमांस केला होता. याव्यतिरिक्त श्रद्धा ‘स्त्री’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता राजकुमार रावनेही आपल्या नवीन भूमिकेने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या चित्रपटातील श्रद्धाने आपल्या भूताच्या लूकने प्रेक्षकांना पुरते घाबरवले होते.

तिच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘हसीना पार्कर’, ‘ओके जानू’ आणि ‘साहो’ या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिकेतील नायिका म्हणून काम केले आहे. श्रद्धा तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती यावर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये ‘नागिन’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फूरिया यांनी केले आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समंथापासून ते कीर्तिपर्यंत टॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री कमावतात बक्कळ पैसा, एका चित्रपटासाठी घेतात कोट्यवधी रुपये

-खतरनाक! वयाच्या बाराव्या वर्षी गायले पहिले गाणे, वयाच्या २७व्या वर्षी जस्टीन बिबर झालाय ‘एवढ्या’ अब्ज रुपयांचा मालक

-प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणाऱ्या ‘या’ विनोदी अभिनेत्याला बनायचं होतं भलतंच काही


Leave A Reply

Your email address will not be published.