Tuesday, June 24, 2025
Home कॅलेंडर फरहान अख्तर- शिबानी दांडेकरच्या लग्नाच्या प्रश्नावर अभिनेत्रीने सोडलं मौन, सांगितलं कधी करणार लग्न

फरहान अख्तर- शिबानी दांडेकरच्या लग्नाच्या प्रश्नावर अभिनेत्रीने सोडलं मौन, सांगितलं कधी करणार लग्न

बॉलिवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तर बऱ्याच काळापासून आपल्या लव लाईफबद्दल चर्चेत आहे. तो खूप दिवसांपासून अभिनेत्री शिबानी दांडेकरला डेट करत आहे. दोघेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत असतात. आता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची घाई झाली आहे.

चाहते आणि जवळचे मित्र त्यांना लग्नाविषयी नेहमीच विचारत असतात. चाहत्यांच्या या प्रश्नावर आता शिबानी दांडेकरने मौन सोडले आहे. शिबानीने इंग्रजी वेबसाईट बॉलिवूड बबलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने स्वतःचे करियर सोबतच फरहान अख्तरसोबत असलेल्या नात्याविषयी आणि लग्नाविषयी बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली.

शिबानी दांडेकरने सांगितले की, ती फरहान अख्तरसोबत तिच्या नात्याला अजून पुढे घेऊन जाऊ इच्छित आहे. सध्या तिच्या डोक्यात लग्नाचा विचार नाही. शिबानी म्हणाली, “प्रत्येकजण मला आणि फरहानला आमच्या लग्नाविषयी विचारत असतो, पण मी खरं सांगते की आमच्या मध्ये हा मुद्दा येतच नाही. मी सगळ्यांना हेच सांगते की, मी विचार करून तुम्हाला सांगेल. आता असं काहीच नाही.”

शिबानीने सांगितले की, “लॉकडाऊन मध्ये आम्ही एकमेकांना खूप जवळून ओळखले आहे. मी आणि फरहान मिळून वर्कआऊट करतो, चित्रपट पाहतो. आम्ही आमच्या पाळीव कुत्र्यासोबत खूप मस्ती करतो. माझ्यात आणि फरहानमध्ये खूप गोष्टी सारख्याच आहेत.” महत्वाची गोष्ट म्हणजे, की फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

फरहान अख्तरने शिबानी दांडेकरला डेट करण्यापूर्वी, हेअर स्टायलिस्ट अधुना भबानीला घटस्फोट दिला आहे. अधुना भबानी आणि फरहान अख्तरला एक मुलगी सुद्धा आहे. लग्नाच्या सतरा वर्षांनंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला.

सध्या फरहानचा ‘तुफान’ चित्रपट १६ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीझ करण्यात आला. चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. सोबतच सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉक्टर मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज आदी महत्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा