अभिनेत्री शिल्पा शेट्टी हा चित्रपट जगतासोबतच सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय चेहरा आहे. ती केवळ एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर रिऍलिटी शोची जजही आहे. अभिनेत्री योगाच्या माध्यमातून फिटनेसशी संबंधित अनेक माहिती यूट्यूबवर शेअर करत असते. नुकतेच मुंबईत अभिनेत्रीच्या पिझ्झा रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले. शिल्पा मुलगा विआन आणि मुलगी समिषासोबत रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला उपस्थित होती. यावेळचे अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ समोर आले.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिच्या पिझ्झा रेस्टॉरंटचे नाव ‘बिज्जा’ आहे. आपले रेस्टॉरंट उघडल्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या लोकांना पिझ्झा वाटला. शिल्पाची ही शैली अनेकांना आवडली आहे. त्याचबरोबर काही लोकांनी तिला ट्रोल देखील केले आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “ती आतून आणि बाहेरून सुंदर आहे.” तर कोणी शिल्पाला ट्राेल करत म्हंटले की, “एखाद्या गरजूला दोन चपात्या खायला द्या. नुसतं मीडियाचे लोक भरले आहेत. त्यांना त्याची गरज नाही.” शिल्पा शेट्टीच्या पिझ्झा ओपनिंग रेस्टॉरंटमध्ये दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खाननेही हजेरी लावली होती.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी तिच्या स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते. वयाच्या 47 व्या वर्षीही तिचे साैंदर्य कायम आहे. तिने तिच्या लूक आणि फिटनेसने अनेक तरुण मुली आणि अभिनेत्रींना मात दिली आहे. ‘बिज्जा’च्या ओपनिंगमध्येही शिल्पाने तिच्या साैंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, यावेळी ती सिंपल लूकमध्ये दिसली. व्हिडिओमध्ये शिल्पाने लाल रंगाचा ट्युनिक परिधान केलेला असून तिचे केस खुले ठेवले. शिल्पाचा लूक आणि तिची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली.
नुकताच केला लग्नाचा वाढदिवस साजरा
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला 22नाेव्हेंबर राेजी 13 वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त शिल्पाने इन्स्टाग्रामवर तिचा आणि राजचा व्हिडिओ शेअर करुन नवऱ्याला खास शुभेच्छा दिल्या. (bollywood shilpa shetty new pizza restaurant bizza launch in mumbai)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धाडस असावं तर असे! बॉलिवूडमधील घराणेशाहीवर यामी गौतम स्पष्टच बाेलली
अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा असलेला प्रतीक ‘कॅज्युअल सेक्स’ला मानतो योग्य, जाणून घ्या त्याचा सिनेप्रवास