Saturday, June 29, 2024

घरात शिरलेल्या गोरिलाला बाहेर काढण्याऐवजी श्रद्धा कपूरने लावले त्याच्यासोबत जोरदार ठुमके, पाहा मजेशीर व्हिडिओ

लहानपणापासूनच सुंदर दिसणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आज बॉलिवूडमध्ये येऊन, आपले नाव कमावताना दिसत आहे. आपल्या ‘आशिकी २’, ‘बागी’ या चित्रपटांतून तिने खूप प्रसिद्धी मिळवली. तिचा आपला एक वेगळाच चाहतावर्ग आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या ‘चालबाज इन लंडन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

श्रद्धा कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या संबधित काहीतरी पोस्ट करून चर्चेत असल्याचे दिसत आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत पोस्ट करत असून चाहत्यांशी संवाद साधत आहे. आता श्रद्धा पुन्हा एकदा तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. तिच्या घरात एक गोरिला शिरला, ज्याला बाहेर काढण्याऐवजी ती त्याच्याबरोबर नाचताना दिसली आहे.

श्रद्धा कपूरने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ती मजेशीर मूडमध्ये दिसली आहे, आणि गोरिलासोबत जबरदस्त डान्स करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोरिलानेही श्रद्धासोबत एक मजेदार नृत्य सादर केले आहे. आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर ‘हॅलो चार्ली’ हा साहसी चित्रपट लवकरच रिलीझ होणार आहे. या चित्रपटात गोरिला टोटो आणि सरळ साधे चार्ली (आदर जैन) दिसणार आहेत. आता श्रद्धाने या चित्रपटाचा प्रचार करत, हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. या चित्रपटात गोरिला मुख्य भूमिकेत आहे. श्रद्धा गोरिलाबरोबर बरीच मस्ती करत आहे, तसेच ती गोरिलाला डान्स स्टेप्सही शिकवत आहे.

श्रद्धा कपूर तिच्या पुढचा चित्रपट ‘चालबाज इन लंडन’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. या अभिनेत्रीच्या नवीन प्रोजेक्टच्या घोषणेनंतर तिचे चाहते बरेच उत्सुक आहेत. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर या चित्रपटात डबल रोल साकारत आहे. अर्थात, श्रद्धाला दुहेरी भूमिकेत पाहणे, म्हणजे एक मजेशीर अनुभव असेल. श्रद्धाचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

-याला म्हणतात कहर! भोजपुरी स्टार अंकुश आणि शिल्पी यांच्या गाण्याचा राडा, दोन महिन्यातच मिळालेे १८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

-अनुपम खेर यांनी केला रस्त्यावर गाणाऱ्या मुलांचा सुंदर व्हिडिओ शेअर, म्हणाले ‘मला त्यांंना जग…’

हे देखील वाचा