Tuesday, March 5, 2024

दिग्गज गायकाने काढली पाकिस्तानच्या पराभवाची खपली, पाहा व्हायरल व्हिडिओ

बाॅलिवूड आणि क्रिकेटच खूप जुने नाते राहिले आहे. बाॅलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट काेहली यांचे नाते पाहिले की, याचा प्रत्यय येताे. अशातच हिंदी सिनेसृष्टीतील एका दिग्गज गायकाने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

तर झाले असे की, पाकिस्तान क्रिकेट संघ रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडला. अंतिम सामन्यात पाकिस्तानपुढे इंग्लंडचे आव्हान होते, जे ते पार करु शकले नाही. इंग्लंडने हा सामना पाच विकेट्स आणि एक षटक राखून जिंकला. पाकिस्तान संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा पराभव म्हणजे मोठा निराशेचा विषय आहे. मात्र, पाकिस्तानच्या पराभवानंतर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी त्यांच्या ट्विटर अकांउटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत असून साेशल मीडिया युजर्स यावर भन्नाट कमेंट करत आहेत.

व्हिडिओ पाेस्ट करत गायक अदनान सामी (Adnan Sami) यांनी लिहिले की, “चांगला संघ जिंकला! अभिनंदन #इंग्लंड…हा फक्त एक खेळ आहे आणि विजयाच्याआधिच हवेत जाऊन दुसऱ्या संघाना कमी लेखनाऱ्यांसाठी हा चांगला धडा आहे.” #PAKvENG

व्हिडिओमध्ये, बप्पी लहिरी ‘मेरे तो एल लग गए मेरे तो एल लग गए’ गाताना दिसत आहे.  हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत असून साेशल मीडिया युजर्स यावर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत. यावर एक युजर्सने कमेंट करत लिहिले की, ‘ही इस्लामची हार आहे.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘एक कप चहा पाकिस्तानसाठी’ अशा प्रकारे चाहते हसणारे ईमाेजी शेअर करत प्रतिक्रिया देत आहे.

अदनान सामी यांच्या काराकीर्दीविषयी बाेलायचे झाले तर, त्यांनी ‘सून जरा सोनिये सून जरा’, ‘जान मेरे जारी है सनम’, ‘भर दो झोली मेरी या मोहम्मद’ यासारखे दमदार गाणे बाॅलिवूडला दिले आहेत. ( bollywood singer Adnan Sami viral tweet)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! राजकुमार रावचा ‘एवढा’ हाेता पगार, लहान मुलीना डान्स शिकवत चालवले घर

Children’s Day 2022: ‘तारे जमीन पर’ ते ‘मासूम’पर्यंत, बालदिनानिमित्त ‘हे’ बॉलिवूड चित्रपट नक्की पाहा

हे देखील वाचा