Sunday, May 19, 2024

बापरे! राजकुमार रावचा ‘एवढा’ हाेता पगार, लहान मुलीना डान्स शिकवत चालवले घर

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचा ‘मोनिका ओ माय डार्लिंग‘ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील राजकुमारच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. राजकुमार सध्या एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेताे, पण एकेकाळी त्याची कमाई खूपच कमी होती. याचा खुलासा स्वत:ह राजकुमार रावने मुलाखतीदरम्यान केला आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव (rajkummar rao) याने सांगितले की, “तो आठवीत असताना एक लहान मुलगी त्याच्याकडून डान्स शिकायची. यासाठी त्याला 300 रुपये फी मिळत असे.” या संभाषणात त्यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा त्याला पहिल्यांदा पगार मिळाला तेव्हा त्याने घरासाठी किराणा सामान आणलं होतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

राजकुमार म्हणाला, “मला अजूनही आठवतं की, मी मार्शल आर्ट्स, तायक्वांदो करायचो. मी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक विजेता होतो. पण यानंतर माझ्या आयुष्यात डान्सही आला. मग मी डान्स शिकवायला सुरुवात केली. माझी पहिली कमाई इयत्ता आठवीमध्ये झाली, जेव्हा मी एक लहान मुलीला तिच्या घरी डान्स शिकवायला जायचाे. त्यासाठी मला 300 रुपये मिळायचे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

राजकुमारला ‘शाहिद’ चित्रपटासाठी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार  
राजकुमारच्या काराकीर्द विषयी बाेलायचे झालं तर, त्याने 2010 मध्ये ‘रण’ चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याच वर्षी तो ‘लव्ह सेक्स और धोका’ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसला. 2012 मध्ये आलेल्या ‘शाहिद’ चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. यानंतर त्याने ‘काई पो चे’, ‘शादी मे जरुर आना’, ‘बरेली की बर्फी’ आणि ‘स्त्री’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले. (monica o my darling bollywood actor rajkummar rao first salary of rs 300 he bought grocery items for his family)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अडीच वर्षांपूर्वी केला अर्ज’, अक्षय कुमारला भारतीय पासपोर्ट मिळण्यास का हाेताेय उशीर?

नाद करा पण आमचा कुठं! सोनमने मुलाच्या पाळणाघराची दाखवली खास झलक

हे देखील वाचा