Saturday, June 15, 2024

अक्षरा सिंगच्या ‘प्यार एक धोखा है’ या गाण्याने इंटरनेटवर घातला धुमाकुळ, व्हिडिओ व्हायरल

भोजपुरी सेन्सेशन अक्षरा सिंग अभिनय आणि गाण्यासाठीही खूप लोकप्रिय आहे. तिची गाणी चाहत्यांना खूप आवडतात. उत्तम अभिनय आणि चांगले गाण्यासोबतच ती फॅशनमध्येही भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते. अशात भोजपुरी सेन्सेशन अक्षरा सिंगचे नवीन रॅप गाणे ‘प्यार एक धोखा है’ रिलीज झाले आहे, ज्याला प्रेक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.

या गाण्याद्वाराे अक्षरा सिंग (akshara singh) मुलींना इशारा देत आहे की, आजच्या जगात प्रेमाच्या नावावर फसवणूक होत आहे. त्यामुळे अभिनेत्री कूल स्टाइलमध्ये मुलींना सावधान राहण्याचा सल्ला देत आहे. या गाण्यातील अक्षरा सिंगचा स्वॅग आणि स्टाईल चांगलीच पसंत केली जात आहे.

भोजपुरी सेन्सेशन अक्षरा सिंगचे हे रॅप गाणे पिंकी म्युझिक वर्ल्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून रिलीज करण्यात आले आहे, जे आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. दुसरीकडे, या गाण्याच्या प्रमोशनसाठी अक्षराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पाेस्टही शेअर केली आहे, ज्यात तिने लिहिले की, “अभी गौर फरमाने का गर्ल्स….”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

अक्षरा सिंगचे म्हणणे आहे की, “आजच्या काळात प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करण्याचे खूप प्रकरण पाहायला मिळतात. मात्र, प्रेमात लोभ नसतो, ती फक्त एक शुद्ध भावना असते. आजकाल प्रेमाच्या नावाखाली लाेक फूस लावून एकमेकांना फसवत आहेत. म्हणून माझ्या या रॅप गाण्यात मी तेच दर्शविले आहे आणि मुलींना या सगळ्यामुळे गोंधळून जाऊ नका असा इशारा दिला आहे. या गाण्यात मस्ती तर आहेच, पण तरुणाईला एक संदेशही दिला जाते आहे,” असे अक्षराने सांगितले. अक्षरा सिंगच्या हा नवीन रॅप ‘प्यार एक धोखा है’ चे बोल यादव राज यांनी संगीतबद्ध केले आहेत.(bollywood singer akshara singh new rap song pyaar ekd hokha hai released)

निक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर…’, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आजोबा एनटी रामाराव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या ज्युनियर एनटीआरला घेरले जमावाने, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा