Sunday, June 23, 2024

‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर…’, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘चला हवा येऊ द्या‘च्या मंचावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता कुशल बद्रिके सध्या चर्चेत आहे. विनोद विश्वात आपल्या अनोख्या स्टाइलने प्रचंड नाव कमावणाऱ्या कुशलचे खूप चाहते आहेत. कुशल हा गेली अनेक वर्षे त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे. विनोदाचा बादशाह आणि हुकमी एक्का म्हणून कुशलला ओळखले जाते.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामधील त्याच्या कामाचे नेहमीच चाहते कुशलचे (Kushal Badrike) तोंडभरून कौतुक करत असतात. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला कुशल आता पहिल्यांदाच रावरंभा या चित्रपटीत नकारात्मक भूमिकेमध्ये दिसत आहे.

कुशलने ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. या ऐतिहासिक चित्रपटात क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ या दमदार व्यक्तिरेखेत तो दिसत आहे. कुशलच हे रूप भल्याभल्यांना धडकी भरवणारे आहे. नुकताच आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘रावरंभा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

पोस्ट शेअर करताना कुशलने लिहीले की, “मुलांना स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा तानाजी मालुसरे आधी कळायला हवा. तसेच, मुलांना स्पार्टन 300ची गोष्ट कळायला हवी, पण पावनखिंडीवर बाजीप्रभू देशपांडेंसह प्राणांची आहुती देणारे 300 मावळे आधी कळायला हवेत. लढाई जिंकून देणारा महाबली हल्क मुलांना माहित हवा, पण शौर्य आणि इमान यांच दुसरं नाव असलेले सरसेनापती हंबीरराव मोहिते आधी कळायला हवेत.”

त्याचवेळी कुशलने प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे देखील आव्हान केले आहे. हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यावर आधारलेले चित्रपट ‘रावरंभा’ चांगलाच गाजला आहे. (Kushal Badrike’s ‘She’ post went viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
केदारनाथनंतर अक्षय कुमार पोहोचला बद्रीनाथला, ‘अशा’ प्रकरा केले चाहत्यांचे अभिवादन
साधी – भोळी टीना दत्ता बनलीय बोल्ड; मिनी स्कर्टमध्ये फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा

हे देखील वाचा