Monday, June 24, 2024

आजोबा एनटी रामाराव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या ज्युनियर एनटीआरला घेरले जमावाने, व्हिडिओ व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. नुकतेच ज्युनियर एनटीआरचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आरआरआर’मधील ‘नाटू नाटू’ या सुपरहिट गाण्याला ऑस्करचा किताब मिळाला. यासाेबत अभिनेत्याचा चाहता वर्गही खुप माेठा आहे. ज्युनियर एनटीआरचे चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात. अशात आजोबा एनटी रामाराव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या ज्युनियर एनटीआरच्या अवतीभवती चाहत्यांनी गर्दी केली होती, ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, ज्युनियर एनटीआर पांढरे कपडे घालून शताब्दी सोहळ्यासाठी त्याच्या टीमसोबत आलेला दिसत आहे. अशात चाहत्यांच्या गर्दीने अभिनेत्याला पाहिले आणि सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली. काही वेळातच गर्दी इतकी वाटली की, एनटीआरला चालायला जागा उरली नाही. अशात कशी तरी अभिनेत्याने त्या गर्दीतुन सुटका केली अन् बाहेर पडला. हा व्हिडिओ समाेर आल्यानंतर अनेक साेशल मीडिया युजर्सने जमाव करणाऱ्या लाेकांवर टिका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kamlesh Nand (work) (@artistrybuzz_)

ज्युनियर एनटीआरचे आजोबा एनटीआर रामाराव यांनीही 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष टीडीपी अर्थात तेलुगु देसम पार्टीची स्थापना केली, जो अजूनही आंध्रमधील प्रमुख पक्ष आहे. लोक एनटीआर रामारावांची देवासारखी पूजा करतात.

https://twitter.com/tarak9999/status/1662665348020310018?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1662665348020310018%7Ctwgr%5E43226977a5a56dff836fefa2ef94c8c63fd8e3a0%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fentertainment%2Fsouth-cinema%2Fnt-rama-rao-100th-birth-anniversary-jr-ntr-and-kalyanram-nandamuri-remember-2418483

ज्युनिअर एनटीआरच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर जूनियर एनटीआर शेवटचा एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटामध्ये दिसला होता. यानंतर आता हा अभिनेता जान्हवी कपूरसोबत ‘देवरा’मध्ये दिसणार आहे. अशात अभिनेत्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहेत प्रचंड उत्साही आहेत.(tollywood actor jr ntr struggles to move and pay respect at ntr ghat as fans mob devara actor see viral video )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व मुलांच्या मनातच नाही तर…’, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

बिकिनी घालून मॉरिशसच्या रस्त्यावर उतरली सुरभी ज्योती, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

हे देखील वाचा