Saturday, June 29, 2024

अरिजित सिंगच्या चंदीगड कॉन्सर्टबाबत एफआयआर दाखल, काय आहे प्रकरण? लगेच वाचा

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग त्याच्या उत्कृष्ट गायनासाठी ओळखला जातो. त्याची गाणी रिलीज होताच चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट होतात. गाण्यासोबतच अरिजीत त्याच्या चाहत्यांना लाईव्ह कॉन्सर्टमध्येही भेट देतो. मात्र, गायक कधीकधी त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी अडचणीतही येताे. अशात अलीकडेच अरिजितच्या कॉन्सर्टबाबत मोठी बातमी समाेर आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

अरिजित सिंग (arijit singh) त्याच्या गाण्यांनी चाहत्यांना भुरळ पाडताे. सिंगिंग इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अशात अलीकडेच, अरिजितची चंदिगडमध्ये काॅन्सर्ट होणार होती. मात्र, गायकाची काॅन्सर्ट पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला असेल.

गायकाने कार्यक्रम पुढे ढकलल्यानंतर, कार्यक्रम व्यवस्थापन लवकरच नवीन तारीख जाहीर करेल असे सांगितले आहे.  खरे तर, खराब हवामानामुळे या काॅन्सर्टची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अशात या कॉन्सर्टशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे की, या कार्यक्रमाबाबत काही बनावट प्रमाेशन केले जात आहेत, ज्यासाठी एफआयआरही नोंदवण्यात आली आहे.

चंदीगडमध्ये 27 मे रोजी अरिजितची काॅन्सर्ट होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अशात व्यवस्थापनाने चाहत्यांना आश्वासन दिले होते की, हा कार्यक्रम लवकरच पुन्हा आयोजित केला जाईल. मात्र, याबाबत ‘ग्रीन हाऊस इंडिया’ नावाचे इंस्टाग्राम अकाउंट, बनावट पोस्टर्सद्वारे, स्वतःला कॉन्सर्टचा निर्माता असल्याचा दावा करत आहे आणि आपल्या रेस्टॉरंटची जाहिरात करण्यासाठी विनामूल्य तिकीट ऑफर करत आहे.

या तक्रारीबाबत पोलीसही सक्रिय झाले असून या तक्रारीवर कारवाई करताना पोलिसांनी सेक्टर 17 येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 420 (फसवणूक) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(bollywood singer arijit singh chandigarh concert deferred due to weather against firm in police station for fake promotions)

हे देखील वाचा