Saturday, June 15, 2024

मोठी बातमी: बाॅलिवूडचे प्रतिभावान दिग्दर्शक रुग्णालयात दाखल; नुकताच प्रदर्शित झाला ब्लॉकबस्टर सिनेमा

दिग्दर्शक सुदीप्तो सेन सध्या त्याच्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहेत. या चित्रपटाबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सुदीप्तो सेनचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. हा चित्रपट आता जगभरातील 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, सुदीप्तो सेन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदीप्तो सेन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त असतात. ते सततच्या धमक्यांमुळे तणावाखाली असतात. त्यामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वादांनंतरही चित्रपटाची बक्कळ कमाई होत असतानाही हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या दिवशी विरोधाचे कारण बनत आहे.

माध्यमातील वृत्तानुसीर, सुदीप्तो सेन यांची सततच्या प्रवासामुळे प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचमुळे चित्रपटाचे प्रोमोशनही थांबवण्यात आले आहे. यादरम्यान प्रकृती सुधारल्यानंतर 10 शहरांमध्ये ‘द केरला स्टोरी’चे प्रमोशन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

‘द केरळ स्टोरी’ 5 मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटाबाबत अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत. पण या सगळ्यानंतरही ‘द केरळ स्टोरी’ अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत आहे.

सुदिप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच विरोध झाला. एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही राज्यात चित्रपटावर बंदी घातली आहे. मात्र, हा चित्रपट आता पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होत आहे. यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करत आहे. (Director Sudipto Sena admitted to hospital)

हे देखील वाचा