Monday, June 24, 2024

कोलकातामधील कॉन्सर्ट रद्द झाल्यानंतर अरिजीत सिंगने साेडले माैन; म्हणाला, ‘भगवा रंग हा…’

नवीन वर्षाच्या निमित्ताने कोलकाता येथील इको पार्क येथे प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर अरिजित सिंग याचा कार्यक्रम होणार होता. मात्र, काही कारणास्तव तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. एवढेच नाही तर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले होते. काही काळानंतर हा वाद शांत झाला असला तरी, थंडावलेला हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरे तर, काल रात्री म्हणजेच शनिवारी (दि. 18 फेब्रुवारी)ला कोलकाता येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंगने पहिल्यांदाच या वादावर मौन सोडलं आहे. काय म्हणाला प्रसिद्ध गायक? चला जाणून घेऊया…

इकाे पार्क येथील रद्द झालेला कार्यक्रम काही संघटनांनी ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ या गाण्याशी जोडला होता. ते म्हणाले की, ‘गायक अरिजित सिंगला गेरुवा गाण्याची किंमत मोजावी लागली आहे.’ अशात अरजित सिंग यानी पहिल्यांदाच या वादावर माैन साेडले असून रंगाच्या वादामुळे त्याला खूप त्रास झाला असल्याचे सांगितले आहे. गायक अरिजित सिंग म्हणाला की, “फक्त एका रंगावर इतका वाद! भगवा रंग स्वामी विवेकानंदांच्या तपस्वींचा आहे. जर त्यांनी पांढरा रंग परिधान केला असता तर त्यावरून देखील वाद झाला असता का? ” असा थेट सवाल गायकाने विचारला आहे.

खरं तर, डिसेंबर 2022मध्ये कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, गायक अरिजित सिंगने शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील गेरुआ हे हिट गाणे गायले होते. या महोत्सवात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. सीएम ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावरूनच अरिजित सिंगने हे गाणे गायले हाेते.

मात्र, या सर्व वादाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री आणि कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम म्हणाले की, “प्लेबॅक सिंगर अरिजित सिंगचा कार्यक्रम रद्द करण्यामागचे कारण गाण्याचे बोल नसून G-20 कार्यक्रमाची तारीख आहे. G-20 ची तारीख रद्द करता येत नसल्याने गायकाचा कार्यक्रम रद्द करावा लागला.”

हकीम पुढे हे देखील म्हणाले की, G-20 कार्यक्रम ठीक इको पार्कसमोरील कन्व्हेन्शन हॉलमध्ये होणार हाेता. या कार्यक्रमात देश-विदेशातील अनेक विशेष पाहुणे उपस्थित राहणार हाेणे, म्हणून कुणाची गैरसाेय हाेऊ नये किंवा गाेंधळ हाेऊ नये म्हणून आम्हाला गायकाचा कार्यक्रम रद्द करावा लागला. त्याचा कोणत्याही विशिष्ट गाण्याशी संबंध नाही.(bollywood singer arijit singh opens up on gerua row for the first time says so much controversy over a colour tmova )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पैसे कमावण्यासाठी विकायचे चहा, पहिल्या पत्नीसोबत केले होते दुसऱ्यांदा लग्न; वाचा ‘अन्नू कपूर’ यांचा संघर्षमय प्रवास

हंसिका मोटवानी ओटीटीवर तिचे लग्न दाखवण्यासाठी सज्ज, वेब सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज

हे देखील वाचा