Monday, June 24, 2024

हंसिका मोटवानी ओटीटीवर तिचे लग्न दाखवण्यासाठी सज्ज, वेब सिरीजचा दमदार ट्रेलर रिलीज

अभिनेत्री हंसिका मोटवानीने 4 फेब्रुवारी 2022 रोजी उद्योगपती सोहेल कथुरियासोबत लग्न केले. यावेळी हंसिका मोटवानीच्या शाही लग्नाची चर्चा सर्वत्र होती. अशात आता हंसिकाला तिचे लग्न एका वेब सीरिजच्या रूपात प्रेक्षकांना दाखवायचे आहे. हंसिकाने काही काळापूर्वी तिच्या लग्नावर आधारित ‘लव्ह शादी ड्रामा’ या वेब सीरिजचा टिजर रिलीज केला होता. अशात नुकतेच अभिनेत्रीच्या ‘लव्ह शादी ड्रामा’ या वेबसिरीजचा ट्रेलरही समोर आला आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानी (hansika motwani) आणि सोहेल कथुरिया (sohael kathuriya) यांच्या नात्याची सुरुवात दर्शवणारी ‘लव्ह शादी ड्रामा’ ही वेबसिरीज या आठवड्यात टेलीकास्ट होणार आहे. ‘लव्ह शादी ड्रामा’च्या ट्रेलरमध्ये हंसिका आणि सोहेल त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. हंसिका आणि सोहेल हे ट्रेलरमध्ये उघड करत आहेत की, त्यांना एकमेकांशी लग्न करताना कसे वाटते. ट्रेलरमध्ये हंसिका मोटवानीच्या लग्नाची अनेक दृश्ये दाखवण्यात आली आहेत.

अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या स्वप्नातील लग्नाबद्दल बोलत आहे. ती म्हणाली, “लहानपणापासूनच मी एक परिपूर्ण लग्नाचे स्वप्न पाहत हाेते. जेव्हा सोहेल आणि माझी एंगेजमेंट झाली, तेव्हा माझे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले होते आणि मला माहित होते की, माझी स्वप्ने पूर्ण होणार आहेत. आम्हाला त्या मोठ्या दिवसाच्या जर्नीचा प्रत्येक क्षण पुन्हा जगायचा होता, म्हणून आम्ही संपूर्ण गोष्ट चित्रित करण्याचा निर्णय घेतला. जयपूरच्या मुंडोटा फोर्ट अँड पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, जे नेहमीच माझ्या स्वप्नातील ठिकाण होते. माझ्या स्वप्नातील लग्नाच्या प्रत्येक पैलूला परिपूर्ण करण्यासाठी मला सहा आठवडे लागले. असा रोलरकोस्टर असेल हे कोणाला माहीत होते? आम्ही हसलो, आम्ही रडलो आणि आम्ही लढलो, पण शेवटी हे सर्व चांगले होते. मला माझा आनंद जगासोबत शेअर करायचा आहे आणि डिस्ने प्लस हॉटस्टार मला असे करण्यासाठी एक व्यासपीठ देत आहे याबद्दल मी खूप आभारी आहे.”

हंसिका मोटवानीच्या ‘लव्ह शादी ड्रामा’ या वेबसिरीजचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते ही वेब सीरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ट्रेलरवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर काही युजर्सनी कमेंटमध्ये या ट्रेलरचे कौतुक केले आहे.  हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया यांचे लग्न दाखवणारी ही वेब सिरीज 10 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.(bollywood actress hansika motwani sohael kathuriya wedding web series love shaadi drama trailer released on disney plus hotstar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक्स गर्लफ्रेंड सारासाेबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंवर कार्तिक आर्यनने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

प्रग्नेंट आईसोबत भारतात आली, बॉम्बस्फोटात गमावली भावंडं; अरबाजच्या शोमध्ये भावूक झाली हेलन

हे देखील वाचा