Monday, July 1, 2024

गर्लफ्रेंडला खुलेआम किस केल्याने हनी सिंग झाला ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘नशा उतरल्यावर तो व्हिडिओ…’

गायक आणि रॅपर हनी सिंगचा नुकताच घटस्फोट झाला आहे आणि अशातच हनीच्या आयुष्यात नवीन प्रेम आले आहे. तो अनेकदा त्याची नवीन गर्लफ्रेंड टीना थडानीसोबत दिसतो. आता हनी सिंग टीना थडानीसोबत नवीन वर्ष साजरे करत आहे. हनी सिंगने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी टीनासोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हनीने जानेवारी महिन्याला प्रेमाचा सीजन म्हटले आणि टीनासाठी एक रोमँटिक गाणेही गायले.

व्हिडिओमध्ये हनी सिंग (honey singh) टीनासाठी ‘मेरी जान…मीठा पान’ हे रोमँटिक गाणे गाताना दिसत आहे. टीनासोबतचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना हनी सिंगने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्व रसिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हा प्रेमाचा ऋतू आहे, द्वेषाचा नाही. व्हिडिओमध्ये हनी काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत होता, ज्यामध्ये त्याच्या नावाचे लॉकेट आहे. हनी गात असताना, टीना मागून येते आणि हनीच्या नाकावर चुंबन घेते.

आता सोशल मीडिया युजर्सने हनी सिंगला या व्हिडिओवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कमेंट बॉक्समध्ये अनेक चाहते ‘भाऊ, हा व्हिडीओ डिलीट कर’ असे म्हणताना दिसले. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “भाऊ अजूनही नशेत आहे.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की,”चार बोतल वोडका, काम भाई का रोज का.”, तर एका युजरने लिहिले की, “भाऊने ऑफर दिली आहे असे वाटते.” यानंतर एका युजरने ट्राेल करत लहिले की, “भाई छपरी हो गया है.” तर अनेक युजर्स म्हणाले, “भाऊ सध्या नशा करत आहे, नशा उतरल्यावर तो व्हिडिओ डिलीट करेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

घटस्फोटानंतर अवघ्या तीन महिन्यांतच हनी सिंगने टीनासोबतचे नाते जाहीर केले होते. टीना हनी सिंगच्या नवीन गाण्यात ‘पॅरिस का ट्रिप’मध्ये दिसली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात हनीने टीनासोबतच्या त्याच्या नवीन नात्याची घोषणा केली होती. काही दिवसांनंतर हनीने टीनासाठी तिच्या वाढदिवसानिमित्त एक रोमँटिक पोस्ट शेअर केली हाेती. टीनासोबतचा फोटो शेअर करत हनीने लिहिले होते की, ‘हॅपी बर्थडे टीना थडानी.'(bollywood singer honey singh shares romantic video with girlfriend tina thadani on new year honey singh for kiss her on camera)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कोणी मराठी तर कोणी बॉलिवूडमध्ये करतय पदार्पण, 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार ‘या’ टीव्ही अभिनेत्री

नवीन वर्षाच्या निमित्ताने रणवीर सिंगने शेअर केला अनोखा व्हिडिओ; चाहते म्हणाले,’सर्कस फ्लॉप झाल्यामुळे…’

हे देखील वाचा