Tuesday, January 31, 2023

कोणी मराठी तर कोणी बॉलिवूडमध्ये करतय पदार्पण, 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकणार ‘या’ टीव्ही अभिनेत्री

मनोरंजन क्षेत्रामधील 2022 हे वर्ष खूप चांगल्यारित्या पार पडलं अनेक अभिनेत्री लग्नबंधनाक अडकल्या तर काहींच्या घरी चिमुरड्या पाहुण्यांचे आगमन झाले. छोट्या पडद्यावरील काम करणाऱ्या अभिनेत्रीदेखिल बॉलिवूडमधील अभिनत्रींपेक्षा कमी नाहीत. त्यांना देखिल मोठा चाहतवर्ग असून त्या आपल्या दमदार अभिनयामुळे घराघरामध्ये पोहोचलेल्या आहेत. आपल्या अभिनयासोबतच त्यांच्या फॅशेनसेंन्समुळे सतत चर्चेत असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड असतात. मात्र, 2023 मधील याच अभिनेत्री मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

निमरित कौर अहलूवालिया
कलर्स टीव्हीवरील प्रदर्शित मालिका ‘छोटी सरदारनी’ (Choti Sardarni) या मालिकेमध्ये निमरित कौर अहलुवालिया ( Nimrit Kaur Ahluwalia) हिने मुख्य भूमिकेत काम केले होते. यामध्ये अभिनेत्रीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. निमरितने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलच्या रुपामध्ये केली होती. फेमिना इंडिया 2018 साली निमरित टॉप 12 मध्ये सहभागी असून तिने मिस मणिपुर जिंकलं होतं. सध्या निमरित ‘बिग बॉस 16‘ ची स्टॉंग स्पर्धक आहे. त्याशिवाय अभिनेत्री आपल्या आउटफीटमुळेही सतत चर्चेत असते. कार्यक्रमानंतर ती मोठ्य पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे.

तेजस्वी प्रकाश
बिग बस 15‘ ची विजेता तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) हिने अनेक मालिकामध्ये काम केले आहे. मात्र, बिग बॉसचं विजेपद मिळाल्यानंतर तिला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या अभिनेत्री टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका नागिनमध्ये काम करत आहे. आपल्या अभिनयाशिवाय तेजस्वी सतत तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा याच्याुळे देखिल प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. तिने काही दिवसांपूर्वीच ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाद्वारे मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे.

शेहनाज गिल
‘बिग बॉस’ मधील आपल्या कॉमेडीमुळे आणि दिलखुलीस अंदाजामुळे शेहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill)
लाखो चाहत्यांची फेवरेट बनली आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर तिच्या आवाजातील अनेक व्हिडिओ व्हायरल झााले होते. प्रेक्षकांना तिची आणि सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla)  याची केमिस्ट्री खूपच पसंतीस उतरली. बिग बसमुळे अभिनेत्रीला अमाप प्रसिद्धा लाभली यानंतर तिने आरल्या आयुष्यात मागे वळुन पाहिले नाही. शेहनाज लवकरच किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

प्रणाली राठोड
टीव्हीवरील प्रदर्शित लोकप्निय कार्यक्रम ‘बॅरिस्टर बाबू’, ‘क्यों अच्छे दिल छोड आए’ सारख्या कार्यक्रमामध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रणाली राठोड (Pranali Rathod) हिने मुख्य भूमिकेत काम केले असून तिला खरी बॅरिस्टर बाबू मालिकेमुळे मिळाली. य़ानंतर तिने अनेक दिवसापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मध्ये ती मुख्य भूमिकेत काम करत असून तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियेत वाढ झाली आहे. त्यमुळे ती लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनाही बसलाय ऑनलाइन फसवणुकीचा झटका, वाचा यादी
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी

हे देखील वाचा