Friday, April 26, 2024

अक्षया लग्न पुण्यात करण्यामागचा पहिला विचार सांगत म्हणाली, ‘जेव्हा ठरलं की….’

तुझ्यात जिव रंगला‘ फेम राणा दा आणि पाठक बाई हे जोडपं खऱ्या आयुष्यामध्ये लग्नाबंधनात अडकलं आहे. अनेक दिवसांपसाून अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी एकमेकांना डेट करत होते. शेवटी त्यांनी आपल्या नात्याची गाठ बांधली. मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांची फेवरेट जोडी (दि, 2 डिसेंबर) रोजी लग्नबंधनात अडकल्यामुळे त्यांना देखिल खूपच आनंद झाला आहे. नुकतंच अक्षयाने वेडिंग वेन्यूसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) मुळची पुण्याची आहे, मात्र, हार्दिक जोशी पुण्याचा नसल्याने लग्न पुण्यातच करणे यावर अनेकांचे वेगवेगळे मत होते. लग्न समारंभ आणि लग्नातील सगळे सोहळे देखिल पुण्यात पार पडले मात्र, सगळ्यांच एकमत होणं सगळ्यांना सोहळ्यात आनंद मिळणे तितकेच महत्वाचे होते. याविषयावर सगळेच एकमत झाले, तेव्हा तिने एक पोस्ट शेअर करत माहिती सांगितली. (Akshaya-Hardeek Wedding, Akshaya share Post wedding venue in pune)

अक्षयाने पोस्ट शेअर करत लिहिले की, “लग्न पुण्यात करायचं जेव्हा ठरलं तेव्हा पहिला विचार हा आला की, आम्हा दोघांच्याही इतक्या मोठ्या families मावतील असच ठिकाण हवं. मग थोडं indoor पण हवं आणि थोडं outdoor पण हवं, आणि मग धावपळ सुरु झाली! काही ठिकाणं पाहिली पण आवडली नाही. मग आमचा Wedding Planner @bhagatamol ने @siddhigardensandbanquets चं नाव सुचवलं. आणि अगदी हवं तसं ठिकाण आम्हाला सापडलं..! Banquets & Gardens सोबतच उत्तम rooms ही असल्याने काहीही अडथळा न येता आम्ही दोन दिवस आमच्या family व friends सोबत धम्माल केली. So Thank You So Much @multispiceveg for excellent food & @siddhigardensandbanquets for Superb Venue & Service.”

 

View this post on Instagram

 

अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. लग्नापासून अक्षया आणि हार्दिक चांगलेच चर्चेत आले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
हाफ चायनिज! कान्या वेस्टने एलन मस्कवर व्यक्त केला संताप
राणा दग्गुबतीने विमानतळावरील अनुभव सांगत केली टिका, इंडिगो एअरलाइनने रिट्वीट करत…

हे देखील वाचा