Saturday, June 15, 2024

शहनाज गिलविरोधात ट्विट केल्याने ट्रोल झाली सोना महापात्रा; चाहते म्हणाले, ‘फुटेज हवे असेल तर…’

गायिका सोना मोहपात्रा तिच्या गाण्यांपेक्षा जास्त वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाते. दररोज ती कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपले मत मांडते आणि ट्रोलची शिकार बनते. अनेकदा तिचे विधाने सोशल मीडियावर व्हायरलही होतात. एकीकडे पंजाबची कॅटरिना म्हणजेच शहनाज गिलला संपूर्ण जगाचे प्रेम मिळते, तर दुसरीकडे सोना मोहपात्रा शहनाजवर नाराज असल्याचे दिसत आहे. नुकतेच सोना महापात्राने शहनाजबद्दल ट्विट केले होते, ज्यानंतर चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

अलीकडेच सोना महापात्रा (sona mohapatra) हिने तिच्या ट्विटर हँडलवर शहनाजबद्दल ट्विट केले आणि तिच्या टॅलेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. साेना म्हणाली, “शहनाजला ट्विटरवर इतके लक्ष का दिले जाते?” सोनाच्या या ट्विटनंतर लोकांचा असा अंदाज आहे की, मीटूचा आरोपी साजिद खानला पाठिंबा दिल्याने गायिका शहनाजवर अजूनही नाराज आहे.

सोनाच्या या ट्विटनंतर लोकांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि साजिदला सपोर्ट करण्यासाठी सोना फक्त शहनाजला का टार्गेट करत आहे, असा सवाल केला. यावर उत्तर देताना सोनाने एक ट्विट केले आणि लिहिले की, “प्रिय ट्रोलर्स जॅकलीनसारख्या अजून एका अभिनेत्रीसाठी उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मला माहित नाही की, शहनाजचा खास टॅलैंट काय आहे? सध्या, ती एक टीव्ही रिअॅलिटी शो व्यतिरिक्त काहीही करत नाही, पण मला त्या महिलांचे मार्ग माहित आहेत, ज्या शॉर्टकटच्या माध्यमातून चांगले पैसे कमवतात.”

सोनाच्या या ट्विटनंतर शहनाजच्या चाहत्यांनी ट्विटरवर तिचा खरीखाेटी सुनावली. एका युजरने ट्विट करत लिहिले की,  “साजिद खानला शोमध्ये बोलावल्याबद्दल चॅनलला दोषी ठरवले पाहिजे. शहनाजला नाही, जिने फक्त त्याला शुभेच्छा दिल्या.” तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, “मॅडम, तुम्हाला फुटेज हवे असेल तर बोला. पूर्ण देईन, पण तुमच्या आतली घाण काढून फुटेज घेऊ नका.”

मंडळी, सोना महापात्रा गायिका, संगीतकार आहे. सोना कुणाला घाबरत नाही. तिने बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सच्या लोकांशी पंगा घेतला आहे. दररोज ती एक ना एकवर निशाणा साधत वक्तव्ये करत असते. शहनाजला ट्रोल केल्यामुळे ती आता चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. (bollywood sona mohapatra brutally got trolled after questioning on shehnaaz gil talent on twitter)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मन की बात’मध्ये मोदींनी काढली लता मंगेशकर यांची आठवण, जाणून घ्या काय बाेलले स्वर कोकिळाबद्दल

अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहायला मिळाली सिड – कियाराची जबरदस्त केमिस्ट्री, दाेघांनी हातात हात घेतला अन्…

हे देखील वाचा