Tuesday, June 18, 2024

‘मन की बात’मध्ये मोदींनी काढली लता मंगेशकर यांची आठवण, जाणून घ्या काय बाेलले स्वर कोकिळाबद्दल

स्वर कोकिला लता मंगेशकर आज आपल्यात नसल्या तरी, त्यांची आठवण आपणा सर्वांनाच येते. लताजी यांनी त्यांच्या मधुर आवाजाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. मागच्यावर्षी जेव्हा लता जी यांचे निधन झाले, तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांच्या निघून गेल्याने दु: खी हाेती. सिनेमाच्या जगात आजही त्यांची कमतरता खालवते. जेव्हा लता जी यांचे निधन झाले, तेव्हा पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केला हाेता. अशात आता अलीकडेच पंतप्रधानांनी पुन्हा एकदा लता दीदींची आठवली काढली आहे.

नरेंद्र माेदींना आली लता मंगेशकर यांची आठवण
आज म्हणजेच रविवारी (दि. 26 फेब्रुवारी)ला, पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चा 98 वा भाग प्रसारित झाला. यावेळी ते बर्‍याच विषयांवर बाेलले असून त्यांनी तीन स्पर्धांबद्दल सांगितले. ज्यादरम्यान, त्यांना स्वर कोकिला लता मंगेशकर आठवल्या. पंतप्रधान म्हणाले की, “आज या क्षणी लता मंगेशकर जी यांची आठवण येणे स्वभाविकच आहे. कारण, जेव्हा या स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हा लता दीदी यांनी देशवासियांना ट्विट करून या स्पर्धेमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते.”

मोदींना उस्ताद बिस्मिल्लाह खानदेखील आठवले
इतकेच नव्हे, तर पंतप्रधान मोदींना उस्ताद बिस्मिल्लाह खान देखील आठवले. वाराणसीचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले, “बनारस, शेहनाई, उस्ताद बिस्मिल्लाह खान जी यांची असेल, तर स्वभाविक आहे, माझे लक्ष त्या बाजूने जाईन” काही दिवसांपूर्वी उस्ताद बिस्मिला खान यांना युवा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार त्या लाेकांना दिला जाताे, जे कला आणि संगित क्षेत्रात लाेकप्रियता वाढवण्यासाेबतच स्वत:ही याेगदान देतात.

लता मंगेशकर यांच्या विषयी बाेलायचे झाले, तर त्यांना त्यांच्या गायिकीचा आणि मेहनतीचा सन्मान म्हणून भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके, राजीव गांधी सद्भावना पुरस्कारसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. (pm modi remember bollywood singer lata mangeshkar in mann ki baat for competition)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी मागितली शाहरूखची माफी, नेमके काय प्रकरण आहे?

शिव ठाकरेने घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, काय आहे या भेटीचे महत्त्व? जाणून घ्या…

हे देखील वाचा