या कोरोना महामारीमध्ये जेव्हा लोक मदतीची आस लावून बसले होते, तेव्हा सोनू सूदने त्यांना शक्य ती मदत केली. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यापासून तो लोकांना मदत करत आहेत. देशातील असंख्य लोकांना त्याने मोठमोठ्या अडचणींमधून वाचवले आहे. अशा परिस्थितीत, लोकांनी त्याला मसीहा मानणे साहजिकच आहे. तो नि: स्वार्थपणे लोकांची सेवा करण्यात गुंतलेलाच आहे. अलीकडेच अभिनेत्याने आपल्या या मदतकार्याच्या प्रवासाशी संबंधित बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आणि या दरम्यान त्याला कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला, हे देखील सांगितले.
आज बहुतेक लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की, सोनू सूद इतक्या मोठ्या संख्येने लोकांना मदत कशी करत आहे. एका वृत्तवाहिनीसोबतच्या संभाषणादरम्यान अभिनेत्याने याचे उत्तर दिले. तो म्हणाला, “मी असे म्हणेल की, प्रशासन देखील मदत करत आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला हे करावे लागेल, कारण यावेळी प्रत्येकाला प्रत्येकाची आवश्यकता आहे. मी स्वतः काम कसे करतो, हे मला देखील समजत नाही. मी फोनवर जवळपास २२ तास असतो. आम्हाला ४० ते ५० हजार दरम्यान मदतीसाठी विनवण्या येत असतात. माझ्याकडे १० लोकांची एक टीम आहे, जे फक्त रेमेडिसिविरसाठी फिरतात. माझी एक टीम बेडसाठी फिरते. आम्ही शहरानुसार फिरत असतो.”
सोनू पुढे म्हणाला की, “मला देशभरातील डॉक्टरांशी बोलावे लागते, त्यांना उपचारासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या लवकरात लवकर पुरवाव्या लागतात. आम्ही ज्या लोकांना मदत केली आहे, ते एक प्रकारे आमच्या टीमचा भाग बनतात. मी तुम्हाला सांगतो की, मला इतक्या विनंत्या येतात, जर मी त्या सर्व पाहायला गेलो, तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला किमान ११ वर्षे लागतील. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
अभिनेत्याला विचारले गेले की, अशा कठीण काळात तो धैर्य कसे राखतो. यावर उत्तर देत सोनूने एक कहाणी सांगितली. तो म्हणाला, “आम्ही एका मुलीला रुग्णालयात बेड मिळवून देण्याला प्रयत्न करत होतो, पण बेड मिळत नव्हता. रात्रीचे १ वाजले होते आणि तिची बहीण फोनवर खूप रडत होती. ती म्हणत होती, कृपया तिला वाचवा, नाहीतर आमचे कुटुंब संपेल. मी खूप अस्वस्थ होतो. बघता बघताच रात्रीचे २.३० वाजले. मी प्रार्थना करत होतो की, सकाळपर्यंत ती मुलगी जिवंत राहावी, कारण सकाळी आम्ही तिला बेड मिळवून देऊ शकलो असतो. मला सकाळी ६ वाजता फोन आला आणि मी तिला बेड मिळवून दिला. आता ती ठीक आहे. मला आनंद झाला की, मी तिला मदत करू शकलो.”
यावरून अभिनेत्याने असे सांगितले की, यावेळी त्याच्याकडे नकारात्मक विचार आणि रागासाठी वेळ नाहीये. यावेळी, लोकांनी आपला राग आणि चिडचिडेपणा सोडून, इतरांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’ फेम हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांकडून अटक, काय आहे प्रकरण? घ्या जाणून
-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल










