‘बिग बॉस’ फेम हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांकडून अटक, काय आहे प्रकरण? घ्या जाणून

Hindustani Bhau AKA Vikas Pathak Arrested In Mumbai He Was Former Bigg Boss Contestant


टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक ‘हिंदुस्तानी भाऊ’ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. या संदर्भातील पोस्ट पॅपराजी व्हायरल भयानीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

पॅपराजीने या पोस्टमध्ये लिहिलेे आहे की, शनिवारी (८ मे) हिंदुस्तानी भाऊ हा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये प्रदर्शन करत होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदुस्तानी भाऊ शिवाजी पार्कमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द व्हावी, यासाठी प्रदर्शन करत होता. यासोबतच त्याने अशीही मागणी केली होती की, शासनाने विद्यार्थ्यांची शाळेची फी रद्द करावी.

सोशल मीडियावर आपण सर्वांनी नेहमीच हिंदुस्तानी भाऊला झळकताना पाहिलं आहे. तो नेहमीच देशातील मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो. नुकतेच त्याचे इंस्टाग्राम अकाउंट वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. असे म्हटले जाते की, यामागे पुनीत शर्माचा हातत आहे. त्याचे अकाउंट सन २०२० मध्ये निलंबित केले होते. त्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे बंद झाले होते. त्यानंतर तो आता मुंबईत मोकळेपणाने प्रदर्शन करत आहे.

हिंदुस्तानी भाऊ सुरुवातीपासूनच आपल्या व्हिडिओंमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. देश- विदेशातील वेगवेगळ्या घटनांवर तो व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतो. एकीकडे त्याला चाहत्यांकडून पसंती मिळत असायची, तर दुसरीकडे त्याला विरोधही व्हायचा.

हिंदुस्तानी भाऊला सुरुवातीपासूनच सुपरस्टार संजय दत्तचा मोठा चाहता असल्याचे म्हटले जात आहे. परंतु याचा उल्लेख त्याने स्वत: कधीही केला नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.