Saturday, March 2, 2024

बाॅलिवूडमध्ये शिल्पा शेट्टीपासून ते आमिर खानपर्यंत ‘या’ स्टार्सनी थेट चाहत्यांसाेबत थाटला संसार

समाजाच्या नियमांना मागे टाकून बॉलीवूड स्टार्स कायमच स्वतःच्या अटींवर आयुष्य जगले आहेत. काही स्टार्सनी 40 नंतर लग्न करून एक नवा आदर्श ठेवला, तर काही अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट हाेवून त्याबद्दल समाजाशी बाेल्या. इतकंच नाही, तर इंडस्ट्रीमध्ये काही नावाजलेले स्टार्स आहेत, ज्यांनी पती किंवा पत्नी म्हणून आपल्या फॅन्सची निवड केली आहे. या सेलिब्रिटींच्या यादीत काेणा – कोणाच्या नावाचा समावेश आहे? चला जाणून घेऊया…

शिल्पा शेट्टी (shilpa shetty)
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी वयाच्या 47 व्या वर्षीही तिच्या फिटनेस आणि सौंदर्याने लोकांना प्रेरित करत आहे. या अभिनेत्रीच्या स्टाईलने जगाला वेड लावले आहे. त्याचवेळी, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शिल्पाचा पती राज कुंद्रा एकेकाळी तिचा मोठा चाहता होता. दोघांची पहिली भेट लंडनमध्ये झाली. त्यावेळी शिल्पा एका परफ्यूम ब्रँडच्या प्रमोशनसाठी तिथे गेली होती. यादरम्यान, राजने शिल्पाला प्रमोशनमध्ये खूप मदत केली. मग काय, दोघांची जवळीक वाढली आणि 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलेही आहेत.

विवेक ओबेरॉय (vivek oberoi)
विवेक ओबेरॉय याने प्रियांका अल्वासोबत लग्न केले. ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअप नंतर बाहेर पडण्यासाठी प्रियांकाने विवेकला खूप साथ दिली. आई-वडिलांमुळे हे जोडपे भेटले हाेते. फॅमिली फ्रेंड असूनही प्रियंका विवेकला खूप दिवसांपासून पसंत करत होती. अशातत विवेकबाबत तिची आवड अधिकच वाढत गेली आणि दोघांनी लग्न गाठ बांधली.

आमिर खान (aamir khan)
मिस्टर परफेक्शनिस्ट आणि किरण राव यांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटादरम्यान झाली होती. किरण राव आमिरच्या लगान या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक होती. असे म्हटले जाते की, किरण ही आमिरची फार पूर्वीपासून मोठी चाहती होती. दोघांचे लग्नही झाले, पण हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. (bollywood stars who get married to their fans from shilpa shetty to vivek oberoi)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राताेरात सुनील ग्रोव्हरला करण्यात आले रिप्लेस, रिजेक्शननंतर ‘अशी’ हाेती कॉमेडियनची अवस्था

धर्म बदलल्यानंतर राखी सावंतने पहिल्यांदाच रोजा ठेवला; बुरखा परिधान केलेला व्हिडीओ व्हायरल

हे देखील वाचा