Saturday, March 2, 2024

धर्म बदलल्यानंतर राखी सावंतने पहिल्यांदाच रोजा ठेवला; बुरखा परिधान केलेला व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यापूर्वी ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि आदिल खान दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. आदिलसोबत लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि राखीवरून फातिमा असे नाव बदलले. तिचा आदिलसोबत वाद असला तरी, ती मुस्लिम धर्माचे पालन करेल असे राखीने आधीच स्पष्ट केले हाेते. मात्र, मुस्लिम धर्म स्विकारल्याने राखी अनेकदा युजर्सच्या निशाण्यावर असते. अशात राखी पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे.

खरे तर, राखी सावंत (rakhi sawant) हिने अगोदरच सांगितले होते की, आदिलने तिच्यासोबत गैरवर्तन केले असले तरी ती रोजा ठेवेल. अशात आता पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत राखीने राेजा ठेवला आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने एका इफ्तार पार्टीत आपला उपवास सोडला, जिथे तिचे मित्रही उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हायरल व्हिडीओमध्ये राखी बुरखा परिधान करून दिसत आहे. मात्र, यादरम्यान तिच्या हातातून निकाब खाली पडतो. यासाेबत राखीचा आणखी एका व्हिडिओ व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये राखी जमिनीवर बसली आहे आणि तिच्यासमोर विविध प्रकारची फळे कापून प्लेटमध्ये ठेवले आहे. उपवास सोडण्यापूर्वी राखीने तिच्या मैत्रिणींसोबत अल्लाची पूजा केली आणि खजूर खावून उपवास सोडला. मात्र, राखीची ही स्टाईल युजर्सना आवडली नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीला ट्रोल करत एका युजरने लिहिले की, ‘तिला प्रत्येक गोष्टीत प्रसिद्धी हवी आहे. त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘नौटंकीबाज’. अशातच एका युजरने लिहिले की, ‘ती कधी हिंदू हाेती? ती कधी ख्रिश्चन असते, तर कधी मुस्लिम.’ अशा प्रकारे साेशल मीडिया युजर्स राखीच्या या व्हिडिवर भिन्नभिन्न कमेंट करून तिला ट्राेल करत आहेत.(tv actress rakhi sawant host iftar party got trolled by social media user video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एर लिओनी, सब पर भारी! पाहा सनीचा वनपीसमध्ये राॅयल अंदाज

राताेरात सुनील ग्रोव्हरला करण्यात आले रिप्लेस, रिजेक्शननंतर ‘अशी’ हाेती कॉमेडियनची अवस्था

हे देखील वाचा