देओल कुटुंब त्यांच्या परस्पर संबंधांमुळे बर्याचदा चर्चेत राहते. चार मुले आणि त्यांची पहिली पत्नी सोडून धमेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमकथेबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. या जोडप्याला ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. तसे तर सनी देओल आणि बॉबी देओलचे त्यांच्या दोन बहिणींशी संबंध चांगले असल्याचे सांगितले म्हटले जाते, परंतु तुम्हाला माहिती आहे का? सनी आणि बॉबी दोघेही या बहिणींच्या लग्नात उपस्थित नव्हते.
हेमा मालिनी यांनी ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात याचा उल्लेख केला होता. या पुस्तकात त्यांनी हे उघड केले होते की, जेव्हा त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न होते, तेव्हा भावाचे कर्तव्य इतर कोणीतरी पार पाडले होते. शूटिंगमुळे सनी आणि बॉबी आपल्या बहिणींच्या लग्नात पोहोचू शकले नव्हते. त्यावेळी दोघेही देशाबाहेर आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते.
याच कारणास्तव, अहाना आणि ईशा देओलच्या लग्नात भावाची भूमिका धर्मेंद्रचा पुतण्या अभय देओलने निभावली होती. अभय हाच तो व्यक्ती होता, ज्याने आपल्या बहिणींच्या लग्नात महत्त्वाची भूमिका निभावून विधी पार पाडला होता. अभयचे इशा आणि अहानाशी सुरुवातीपासून चांगले संबंध आहेत. ते बऱ्याचदा एकमेकांच्या आठवणीत पोस्टही शेअर करत असतात.
असे म्हणतात की, सनी आणि बॉबी त्यांच्या सावत्र बहिणी ईशा आणि अहानावर खूप प्रेम करतात आणि त्यांचे खूप संरक्षणही करतात. पण जेव्हा ईशा आणि अहानाच्या लग्नात सनी देओल आणि बॉबी देओल दोघांचा सहभाग दिसला नव्हता, तेव्हा लोकांनी काहीतरी वेगळाच अंदाज लावायला सुरुवात केली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही नक्की वाचा-
आणि वैगातलेल्या सनी देओलने सख्खा भाऊ बॉबीच्या मारली होती कानाखाली
तब्बल २० वर्षांपूर्वी ‘गदर’मध्ये हॅन्डपंप उखाडून सनी देओलने घातला होता राडा; दिग्दर्शकाने सांगितले कसा लिहिला होता सीन










