आणि वैगातलेल्या सनी देओलने सख्खा भाऊ बॉबीच्या मारली होती कानाखाली


बॉलिवूडमध्ये अनेक भावाभावांची आणि बहिणींची जोडी फेमस आहे. त्यांनी जरी कधी एकत्र काम केले नसले तरी त्यांच्या चित्रपटात त्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशीच एक बॉलिवूड मधील लोकप्रिय भावांची जोडी म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओल. सनी हा बॉबीवर खूप प्रेम करतो. ऑनस्क्रीन जेवढे त्या दोघांमध्ये प्रेम दिसते तेवढेच प्रेम ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील एकमेकांवर करतात. त्या दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट केले गेले आहे. पण त्या दोघांच्या बाबत हि गोष्ट खूप कमी जणांना माहीत असेल की, आपल्या भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सनीने एकदा बॉबीला खणखणीत कानाखाली लावली होती.

बॉबी देओलने 2005 मध्ये दिलेल्या त्याच्या एक मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यावेळी त्याने सांगितले होते की,” मी जेव्हा 11 वर्षाचा होतो, तेव्हा अजिबात अभ्यास करत नव्हतो. त्यावेळी माझ्या क्लासच्या शिक्षकांनी माझ्या भावाकडे माझी तक्रार केली होती की, मी वेळेवर क्लासला जात नाही आणि दिलेला अभ्यास देखील वेळेवर पूर्ण करत नाही. मला अजूनही तो क्षण आठवतोय, हे सगळं ऐकल्यावर त्याने आई बाबांना न सांगता जोरदार माझ्या कानाखाली मारली होती. परंतु त्यानंतर त्याने एकदाही माझ्यावर हात उचलला नाही.”

या सोबतच बॉबीने सांगितले की, सनीला त्याचे कपडे इतर कोणी घातलेले अजिबात आवडत नाही. पण तरीही बॉबी अनेक वेळा त्याच्यापासून चोरून लपून त्याचे कपडे घालतो. त्याने सांगितले की,”मला आजही आठवतं जेव्हा मी 10 वीला होतो. तेव्हा माझ्या फेअरवेल पार्टीसाठी मी सनीच्या कपाटातून चोरून जीन्स, शर्ट आणि टाय घातली होती. तेव्हा मला तो खूप ओरडला होता.”


Leave A Reply

Your email address will not be published.