आपल्याकडे नेहमी म्हटले जाते की, दोन व्यक्ती एकत्र आले तर भांड्याला भांडे लागणारंच. हा नियम सामान्य माणसांच्या आयुष्यासोबतच कलाकारांच्या जीवनाला देखील लागू होणारा आहे. दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद हे होतातच. मात्र, कामाच्या निमित्ताने सोबत आल्यानंतर स्वभाव न आवडणे, वागणूक न आवडणे आदी अनेक कारणांमुळे कलाकारांमध्ये मतभेद होतात. काही कलाकार झालेले मतभेद विसरून पुन्हा एकत्र येतात, तर काही कायमच मतभेद लक्षात ठेऊन राहतात. सिनेसृष्टीमधे एकमेकांशी न बोलणाऱ्या, भांडण झालेल्या अनेक कलाकारांची मोठी यादी आहे. याच यादीतले एक नाव म्हणजे सनी देओल. ऍक्शनपटांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनीचे देखील या इंडस्ट्रीमध्ये काही कलाकारांसोबत मतभेद आहे. सनीचा स्वभाव हा त्याच्या चित्रपटांमधील भूमिकेसारखाच चिडका आहे. सनीने त्याचे हे मतभेद कायम स्मरणात ठेवले आहे. अनेक वर्षांनंतरही तो त्याला न आवडणाऱ्या आणि वाद झालेल्या कलाकारांशी आजही बोलत नाही. जाणून घेऊया असे पाच कलाकार ज्यांच्याशी सनीचे वाद आहेत.
आमिर खान
आमिर खान आणि सनी देओल या दोघांची दुश्मनी 31वर्षांपूर्वी सुरु झाली होती. 31वर्षांपूर्वी सनीचा ‘घायल’ आणि आमिरचा ‘दिल’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आमिरने सनीला विनंती केली होती की, त्याने त्याच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी. मात्र, सनीने तसे केले नाही. दोघांचेही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. मात्र, सनी आणि आमिर यांच्यातील बोलणे बंद झाले.
अजय देवगण
बॉलिवूडच्या सिंघमला म्हणजेच अजय देवगणला यारो का यार म्हटले जाते. अजयचे खूप कमी लोकांसोबत वाद किंवा भांडण असतात. मात्र, 2002 साली ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान या दोघांमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नाहीत.
शाहरुख खान
‘डर’ चित्रपटात सनीने नायक, तर शाहरुखने खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा सुपरहिट झाला. आणि इंडस्ट्रीपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वच लोकं फक्त आणि फक्त शाहरुखचीच स्तुती करत होते. त्यामुळे सनीने शाहरुखशी बोलणे सोडल्याचे म्हटले जाते.
अक्षय कुमार
अक्षय आणि सनीचे नाते देखील चांगले नाहीये. अक्षय आणि सनी यांनी एका चित्रपटात सोबत काम केले होते. या दोघांमध्ये रवीना टंडनवरून भांडण झाले होते. सनी आणि रवीना एका सिनेमात सोबत काम करत होते, तेव्हा रवीनाने सनीला तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितले, ते सांगताना ती खूप रडली. त्यामुळे सनी अक्षय कुमारशी भांडण करायला गेला होता.
अनिल कपूर
सनी देओल आणि अनिल कपूर या दोघांनी ‘जोशीले’ नावाचा सिनेमा सोबत केला आहे. या सिनेमामध्ये जेव्हा नावे आली, तेव्हा सनीच्या नावाच्या आधी अनिलचे नाव आलेले पाहून सनी खूप चिडला होता. त्यानंतर या दोघांनी ‘राम अवतार’ सिनेमात सोबत काम केले. या सिनेमात एका सीनमध्ये सनीला अनिल कपूर यांचा गळा दाबायचा होता, तेव्हा त्याने तो इतका जोरात दाबला की, अनिल कपूर यांना श्वास घ्यायला देखील त्रास होऊ लागला. यानंतर या दोघांनी कधीच एकमेकांशी संवाद साधला नाही.
हेही नक्की वाचा-
–आतुरता संपली! ‘नाळ 2’मधील ‘भिंगोरी’ हे गाणे प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
–….आणि वैगातलेल्या सनी देओलने सख्खा भाऊ बॉबीच्या मारली होती कानाखाली