×

HAPPY BIRTHDAY | तब्बल २३ कोटींचे दोन आलिशान बंगले अन् कोट्यवधी गाड्यांची मालकीण आहे सनी लिओनी, जाणून घ्या तिचा प्रवास

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या हॉटनेससाठी ओळखल्या जातात. यामध्येही सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (sunny leoni)होय. एकेकाळी टॉप ऍडल्ट स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी आज बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे. सनीचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. कदाचित आपल्या विचारही करू शकणार नाही, असाच तिचा प्रवास आहे. अश्लीलतेच्या त्या उद्यागातून बाहेर पडून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख बनवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. परंतु तिने हार न मानता प्रयत्न सुरूच ठेवले आणि आज ती एक प्रसिद्ध कलाकार बनली आहे, जिला कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. हीच अभिनेत्री गुरुवारी (१३ मे) आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा खडतर प्रवास…

सनीचे कुटुंब
सनी लिओनीचा जन्म १३ मे, १९८१ मध्ये कॅनडात झाला होता. तिचे मूळ नाव करनजीत कौर वोहरा आहे. तिचा जन्म एका शीख कुटुंबात झाला होता. ती ११ वर्षांची असताना तिचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले होते. तिचे वडील व्यवसायाने इंजीनिअर असून आई गृहिणी आहे. तिचा भाऊ संदीप सिंग वोहरा अमेरिकेत शेफ म्हणून कार्यरत आहे.

सनी लिओनीने आपल्या कठीण काळात जर्मन बेकरीमध्ये, आणि टॅक्स फर्ममध्येही काम केले आहे. त्यानंतर सनीच्या एका डान्सर मित्राने २००३ ला तिची ओळख प्रसिद्ध ऍडल्ट मासिक ‘पेंटहाऊस’ च्या छायाचित्रकाराशी करून दिली होती. यानंतर सनीने परत कधीच मागे वळून बघितले नाही. मग सनी करनजीत कौरची सनी लिओनी झाली. सनीने पेंटहाऊस व्यतिरिक्त चेरी, मिस्टीक, विविध फूटवेअर कलेक्शन सारख्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे.

लॉस एंजेलिसमध्ये २० कोटींचा बंगला
सनीने मॉडेलिंग, व्यासपीठावरील कार्यक्रम, बॉलिवूड चित्रपट, अनेक रियॅलिटी कार्यक्रम यातून भरपूर कमाई केली आहे. तिचा लॉस एंजिलिसमध्ये एक आलिशान बंगला आहे, त्याची किंमत २० करोड इतकी आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

अंधेरीमध्ये ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा बंगला
सनीचा अंधेरीमध्ये ५ खोल्यांचा आलिशान फ्लॅट आहे, ज्यात स्विमिंग पूलपासुन गार्डनपर्यंत सगळ्या सुखसोयी आहेत. ती आपल्या कुटुंबासमवेत या घरत राहते. या घराची किंमत ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

अभिनयासह करते बिझनेस
आता ती आता ऍडल्ट स्टार म्हणून काम करत नाही. पण असे म्हटले जाते की, आजपण तिची सगळ्यात जास्त कमाई ऍडल्ट वेबसाईट आणि हिंदी चित्रपटातून होते. याव्यतिरिक्त तिने हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. ‘द व्हर्जिनिटी हिट’, ‘द गर्ल नेक्स्ट डोर’ या चित्रपटातून तिने भरपूर कमाई केली आहे. याव्यतिरिक्त ती बिझनेसही करते. तिचे लस्ट नावाने परफ्युम ब्रँड आहे. ज्याची किंमत ६५ कोटी रुपये आहे. हा तिने जवळपास २ वर्षांपूर्वी लाँच केला होता. हे प्रॉडक्ट ऑनलाईन विकले जातात.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

माध्यमांतील वृत्तांनुसार, तिने २००९ ला डॅनियल वेबरसोबत मिळून आपला स्टुडिओ तयार केला आहे, त्याचे नाव आहे सन लस्ट पिक्चर्स. यातून तिच्या संपत्तीमध्ये खूप वाढ झाली आहे, डॅनियल आणि सनीने मिळुन ५६ ऍडल्ट चित्रपटात  काम केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीने २०२१ मध्ये बॉलिवूड चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. ‘जिस्म २’ असे या चित्रपटाचे नाव होते. अभिनयाव्यतिरिक्त ती बिझनेसपण करते. याव्यतिरिक्त ती ११७ करोड रुपयांची मालकीण आहे. एका चित्रपटासाठी ती ४.५ करोड रुपये घेते. सनीकडे ‘बी. एम. डब्ल्यू’, ‘ऑडी ए ५’ यांसारख्या महागड्या गाड्याही आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सन २०११ साली केले डॅनियलसोबत लग्न
सनीने सन २०११ साली डॅनियलसोबत लग्न केले होते. त्यांनी तीन मुले आहेत. त्यातील एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे. तिचे नाव निशा आहे. याव्यतिरिक्त इतर दोन मुलांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. त्यांचे नाव आशेर आणि नोआ आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

Latest Post