Saturday, July 27, 2024

ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांच्याशी भेट झाल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’बद्दल लिहिले…

ऑस्कर पुरस्कार मिळवल्यानंतर गुनीत मोंगा हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्यांनी त्यांच्या ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ सिनेमासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकला आणि संपूर्ण भारतात एकच नाव गाजू लागले गुनीत मोंगा. ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारताची मान उंच करणाऱ्या गुनीत यांच्यावर संपूर्ण भारतावर गर्व असून, सर्वच लोकं त्यांचे कौतुक करत आहे. यातच नुकतेच ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ या शॉर्ट फिल्मच्या संपूर्ण टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० मार्च रोजी त्यांच्या अधिकृत ट्विटवर अकाऊंटवरून त्यांच्या आणि गुनीत मोंगा यांच्या भेटीचे काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुनीत मोंगा आणि त्यांची टीम दिसत आहे. पीएम मोदी यांनी त्यांना त्यांच्या ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ला ऑस्कर मिळाल्यामुळे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

या फोटोंसोबत नरेंद्र मोदी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “द एलिफेंट व्हिस्पर्स या चित्रपटातील प्रतिभेने आणि यशाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत वाहवाई मिळवली आहे. या सिनेमाशी संबंधित अतिशय उत्तम आणि प्रतिभावान टीमशी आज भेट झाली. त्यांनी भारताला गौरव मिळवून दिला आहे”. मोदी यांचे ट्विट आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान ९५ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ सर्वोत्कृष्ट शॉट फिल्म या विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावत विजय मिळवला. या सिनेमासोबत आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला देखील ऑस्कर पुरस्कार मिळाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा