नागराज मंजूळेंच्या ‘या’ चित्रपटाची रिलीझ डेट ठरली, अमिताभ बच्चन दिसणार मुख्य भूमिकेत


कोटोना व्हायरसमुळे सगळेच जनजीवन विस्कळित झाले होते. याचा फटका चित्रपट सृष्टीला देखील मोठ्या प्रमाणात बसला. अनेक चित्रपट लॉकडाऊन दरम्यान प्रदर्शित झाले नाही. अनेक सेनेप्रेमी सगळं काही सुरळीत होऊन चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होते.

आता सगळ्याच गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत आणि अनेक चित्रपटांच्या प्रदर्शित होण्याच्या नवीन तारखा ही जाहीर होत आहेत.

यातच ‘अमिताभ बच्चन’ यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ‘नागराज मंजूळे’ यांनी दिग्दर्शित केलेला ‘झुंड’ हा चित्रपटात यावर्षी १८ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय टी सीरिजने घेतला आहे.

या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत टी सीरिजने अमिताभ बच्चन यांच्या सगळ्या चाहत्यांना माहिती दिली आहे की, झुंड हा चित्रपट १८ जूनला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन हे एका प्रोफेसरची भूमिका साकारताना दिसणार आहेत. जे गल्लीमध्ये खेळणाऱ्या मुलांना फुटबॉल टीम बनवण्यासाठी प्रेरित आणि मदत करतात.

नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नागराज मंजुळे हे मराठी चित्रपटात सृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. याआधी 2016 मध्ये त्यांचा सैराट नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 करोडपेक्षा देखील जास्त कमाई केली होती. झुंड या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिले आहे. अमिताभ बच्चनसोबत मराठी कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

झुंड या चित्रपटाचा पोस्टर मागच्या वर्षीच रिलीज केला होता. या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन एका रेड आणि व्हाइट फुटबॉल न्याहाळताना दिसत आहेत. या चित्रपटाची कहाणी ही सत्य घटनेवर आधारित असून, अमिताभ बच्चन स्लम सॉकर एनजीओ चालवणारे सामाजिक कार्यकर्ता ‘विकास बरसे’ यांची भूमिका निभावणार आहेत. या चित्रपटात त्यांच्या पात्रच नाव ‘विजय बरसे’ असे असणार आहे. चाहत्यांमधील या चित्रपटाची उत्सुकता बघता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे असे दिसते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.