Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना अन् विकीच्या लग्नात झाले हाेते जाेरदार भांडणं, अभिनेत्रीनं केला खुलासा

कॅटरिना अन् विकीच्या लग्नात झाले हाेते जाेरदार भांडणं, अभिनेत्रीनं केला खुलासा

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री कॅटरिेना कैफ आणि अभिनेता विकी काैशल हे बाॅलिवूडमधील सर्वाधिक पसंत केलेल्या जाेडप्यापैकी एक आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे दाेघेही लग्न बंधनात अडकले. गेल्याकाही दिवसांमध्ये कॅटरिना कैफ तिच्या ‘फोन भूत‘ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. याच अनुषंगाने कॅटरिना कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली हाेती. येथे कॅटरिनाने तिच्या लग्नाच्या संबधी गोष्ट शेअर केल्यात.

कपिल शर्मा (kapil sharma) याने कॅटरिना कैफ (katrina kaif) हिला विचारले की, तिला 7 बहिणी आहेत. अशा परिस्थितीत त्या विकी कौशल याचे बूट चोरण्यात यशस्वी झाल्यात का? उत्तरात कॅटरिना कैफने सांगितले की, “विकीचे कुटुंब पंजाबी आहे. त्यांना पंजाबी संस्कृती खूप आवडली. यासोबतच कॅटरिना कैफने बूट चोरीच्या विधीबद्दल सांगताना सांगितले की, “लग्नादरम्यान तिच्या बहिणींमध्ये भांडण झाले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

हे भांडण प्रेमावरून झाले असले तरी. कॅटरिनाने सांगितले की, “बूट चोरीच्या विधीवरून खूप भांडण झाले होते. मला त्याचे आवाजही ऐकू येत होते.” कॅटरिनाने सांगितले की, “ती लग्नात व्यस्त असल्याने त्याकडे जास्त लक्ष देऊ शकली नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिना कैफ तिच्या फोन भूत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. या शाेमध्ये कॅटरिना कैफ व्यतिरिक्त इशान खट्टरही उपस्थित होता. कॅटरिनाचा ‘फोन भूत’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. रिलीजपूर्वी या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. (bollywood there was fight in the marriage of katrina kaif and vicky kaushal)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! अनुपम खेरने अमिताभ बच्चनची केली मालिश; बिग बी म्हणाले, ‘हाय अनुपम..’

जीवलगा! समंथाच्या आजाराची माहिती मिळताच नागा चैतन्यने केला फोन; म्हणाला, ‘काही मदत…’

हे देखील वाचा