कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठा प्रेक्षक आणि खूपच जास्त महत्व प्राप्त झाले. जिथे मनोरंजनाचे सर्वच दरवाजे बंद होते, तिथे ओटीटी सर्वच प्रेक्षकांसाठी वरदान ठरले. ओटीटीने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केले, सोबतच दर्जेदार कलाकृती देखील सादर केल्या. या माध्यमाची तुफान वाढणारी लोकप्रियता आणि आशयप्रधान कलाकृती बॉलिवूडमधील किंबहुना मनोरंजनविश्वातील सर्वच कलाकरांना भुरळ घालताना दिसत आहे. बॉलिवूवडमधील अनेक मोठे कलाकार ओटीटीवर आले आहेत, मात्र रसिकांना अजून कलाकार या माध्यमात बघण्याची खूप इच्छा आहे. चला तर जाणून घेऊया २०२२ वर्षात कोणकोणते बॉलिवूड कलाकार या माध्यमात पदार्पण करणार आहेत.
अजय देवगन- रुद्र-द एज ऑफ डार्कनेस
बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय देवगण देखील यावर्षी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. अजय डिज्नी हॉटस्टारवर ‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ (Rudra:The Edge of Darkness) या सिनेमात दिसणार असून, यात तो एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
शाहिद कपूर :
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर देखील यावर्षी ओटीटीवर दिसणार आहे. मात्र अजून त्याच्या वेबसिरीजचे नाव ठरले नसून या सिरीजचे दिग्दर्शन राज आणि डिके करणर आहेत. या दोघांनी ‘फॅमिली मॅन’ सिरीजच्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन केले आहे.
माधुरी दीक्षित- फाइंडिंग अनामिका
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी डिक्सतच्या अभिनयाचा जलवा यावर्षी ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ती फाइंडिंग अनामिका या थ्रिलर सिरीजमधून सर्वांसमोर येईल.
सोनाक्षी सिन्हा-फॉलन
‘फॉलन’ (Fallen) या वेबसिरीजने सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) तिचे ओटीटीवर पदार्पण करणार आहे.या सिरीजमध्ये ती अंजली भाटी ही भूमिका साकारताना दिसेल.
सोहा अली खान- कौन बनेगा शिखरवती
सोहा अली खान (Soha Ali Khan) ची पहिली सिरीज ‘कौन बनेगा शिखरवती’ (Kaun Banegi Shikharwati) लवकरच अर्थात १४ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, याद्वारे ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
कपिल शर्मा- आई एम नॉट डन येट
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘आई एम नॉट डन येट’ ( I Am Not Done Yet) या सिरीजमध्ये दिसणार असून, यात कपिल त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित किस्से सांगतां दिसेल. ही सिरीज २९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, त्याचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा :










