Wednesday, June 26, 2024

असं कुठं असतं का राव! चिमुकलीचे तोंड उघडेच राहिले, मात्र वरुण धवनने नाही चारला तिला केक; पाहा मजेशीर व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन चित्रपटातील प्रत्येक भूमिकेत स्वत: ला अगदी उत्तमरीत्या मिसळून घेतो. वरुणने त्याच्या कारकीर्दीत रोमँटिक, कॉमेडी, ऍक्शन यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत. काही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना त्यांची पात्रं आवडली, तर काही प्रेक्षकांनी त्याला खास पसंती दिली नाही. वरुण धवन आजकाल त्याच्या ‘भेड़िया’ या चित्रपटामुळे जबरदस्त चर्चेत आहे. तो या चित्रपटात क्रिती सेननसोबत दिसणार आहे. अरुणाचल प्रदेशात या चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे. नुकतेच क्रितीने वरुण धवनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो खूपच मजेदार आहे.

शूटिंगदरम्यान आवडत्या कलाकारांना भेटण्याचा वेडेपणा चाहत्यांमध्ये खूप पाहायला मिळतो. नुकताच एक चाहता त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेटवर पोहोचला. क्रिती सेननने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये वरुण केक कापताना दिसत आहे. वरुणसोबत एक व्यक्ती दिसली आहे आणि त्या व्यक्तीच्या कडेवर एक छोटी मुलगीही आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, वरुण केक कापतो आणि मुलीऐवजी वडिलांना खायला घालतो. आपण पाहू शकता की, वरुणने केक उचलताच निरागस मुलीने तिचे तोंड उघडले, पण तिचे तोंड उघडेच राहते.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये क्रितीने लिहिले, “हा व्हिडिओ तुमचा दिवस बनवेल. आम्ही सर्व तिथेच होतो, होतो ना? वरुण, तू असं केलंस यावर माझा विश्वास बसत नाही.” क्रितीने व्हिडिओ शेअर केल्यानंतर वरुण धवननेही तोच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वरुणने लिहिले, “मुलीचा वाढदिवस, वडिलांनी बनविला. मला माफ कर.”

व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की, कदाचित वरुणचे त्या मुलीकडे लक्षच गेले नसेल. सोशल मीडिया युजर्ससोबतच अनेक कलाकारांनाही हा गमतीदार व्हिडिओ खूप आवडला आहे आणि यावर बऱ्याच कमेंट्सही येत ​​आहेत. क्रितीने शेअर केलेल्या या व्हिडिओला १२ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मातीशी नाळ जोडलेला अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वांसमोर केला बिहारचा ‘लौंडा’ डान्स, ‘द कपिल शर्मा शो’मधील व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ

-शाहिद कपूरची पत्नी मीरा बनली छोटी मुलगी, आजकालच्या पोरा-पोरींना व्हिडीओतून दिलाय ‘हा’ संदेश

हे देखील वाचा