Friday, December 1, 2023

‘या’ भुमिकांमुळे केले होते प्रेक्षकांच्या मनावर राज्य! आजही विवेक ओबेरॉयच्या होतात चर्चा

बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय याने अशा काही चित्रपट केले आहेत ज्याच्यामुळे तो आजही त्याच  भुमिकामुळे ओळखला जातो.  आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच लक्षात राहणाऱ्या भुमिका करुन त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.  ‘कंपनी’ चित्रपटात त्याची खतरनाक भुमिका असो किंवा चित्रपट ‘साथिया’ मध्ये आकर्षित अंदाज असो किंवा ‘युवा’ मध्ये दमदार स्टाईल असो या कलाकाराने खूपच इमानदारीने आपले काम केले आहे. त्याच्या भुमिकासाठी त्याला नामांकनही मिळाले आहे. आज (3 सप्टेंबर) विवेक ओबेरॉय त्याचा वाढदिवस साजरी करत आहे जाणून घेउया त्याच्या चित्रपटाबद्दल.

विवेक ओबेरॉय(Vivek Oberoi) हे असा अभिनेता आहे जो स्वत:च्या अभिनयाला पुर्ण इमानदारीने निभावण्यावर विश्वास ठेवतो. हा अभिनेता लांबचा विचार करुन अशाच भुमिका साकारत असतो. ज्यामुळे त्याचे कौशल्या प्रभावशाली बनत असे. आज विवेक ओबेरॉय आपला 46 वा वाढदिवस साजरी करत आहेत. या खासदिवशी त्याच्या काही चित्रपटातील खास भुमिकाविषयी  जाणून घेउया, ज्यामळे विवेक आजही चर्चेत असतो.

कंपनी
विवेक ओबेरॉय याने आपल्या करिअरची सुरुवात ‘कंपनी’ चित्रपटातून केली होती. त्याने राम गोपाल सारख्या निर्देशकासोबत काम करण्याचा निर्णय केला आणि आरजीवी यांच्या कंपनी चित्रपटातून धमाकेदार सुरुवात केली. या चित्रपटाने विवेक ओबेरॉय यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला.

युवा
विवेकने मणिरत्नम यांच्या ‘युवा’ या चित्रपटात अर्जुनची भुमिका निभवली होती ज्यामध्ये अभिनेता एक जबाबदार व्यक्ती बनत आहे. त्याला समजले होते की तो कोणता किरदार चांगला करु शकेल आणि तशाप्रकारच्या भुमिकामध्ये तो काम करु लागला.

ओमकारा
विवेकने विशाल भारद्वाज यांच्या सोबत ‘शेक्सपियर’ यांच्या नाटकावर बनलेला ‘ओमकारा’ या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये त्याने पुन्हा एकदा आपले कौशल दाखवून दिले आणि ओमकाराचा विश्वासू केशु फिरंगी याची भुमिका निभवली होती.

रक्त चरित्र
विवेक ओबेरॉय पुन्हा एकदा राम गोपल वर्मा सोबत एकत्र आला. ‘रक्त चरित्र’ या चित्रपटामध्ये एका अशा मुलाची भुमिका केली होती ज्यामध्ये त्याच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तीची हत्या होते ज्यामुळे त्याचे आयुष्य खराब होते आणि तो गुन्हेगारीच्या दुनियामध्ये शिरतो.

क्रिश3
‘क्रिश3’ या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन मुख्य भुमिकेध्ये दिसला होता मात्र, यामध्ये विवेकने खलनायकाची भुमिका साकारली होती. यामध्ये तो अपंग असून त्याच्याकडे अद्भुत शक्ती असते ज्याचा उपयोग तो मानवजातीच्या विरेधात करत असतो आणि क्रिश हिरो त्याच्यापासून दुनियाला वाचवतो.


हेही वाचा-
Shocking! आकर्षक फिगर आणि सुंदर दिसण्यासाठी केली प्लास्टिक सर्जरी, पण एक चूक अभिनेत्रीच्या जीवावर बेतली
जेव्हा ब्रेकअपच्या अनेेक वर्षांनंतर एकमेंकासमोर आले होते ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय; वाचा तो किस्सा

हे देखील वाचा