Sunday, December 3, 2023

Shocking! आकर्षक फिगर आणि सुंदर दिसण्यासाठी केली प्लास्टिक सर्जरी, पण एक चूक अभिनेत्रीच्या जीवावर बेतली

मनोरंजन विश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. अर्जेंटिनाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सिल्विना लुना हिचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या 43 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सिल्विनाने प्लास्टिक सर्जरी केली होती, त्यानंतर तिला आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ लागल्या. तिच्या किडनीमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या.

सिल्विनाच्या जाण्याने तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिचे चाहते तिला श्रद्धांजली वाहिली आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीला तिचे वकील फर्नांडो बर्लँडो यांनी दुजोरा दिला आहे. तिने 2011 मध्ये प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर काही दिवसांनी सिल्विना लुनाला आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या. त्यानंतर तिला दवखाण्यात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते.

गुरुवारी (31 ऑगस्ट) सिल्विना लुना यांची अखेर मृत्युशी झुंज संपली. त्या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 79दिवसांपासून तिला अर्जेंटिना येथील इटालियन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिच्या प्रकृतीत काहीही बदल झाला नाही. त्यामुळे सिल्विनाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी विचारले असता तिच्या भावाने बहिणीला व्हेंटिलेटरवरून काढण्याची परवानगी दिली, त्यानंतर काही वेळातच सिल्विनाचे निधन झाले.

सिल्विना लुनाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिचे चाहते दु:खी झाले आहेत. सिल्विना लुना तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 1.5 दशलक्ष फॉलोअर्सद्वारे किती लोकप्रिय होती याची तुम्ही सहज कल्पना करू शकता. तिने तिच्या अभिनय कारकिर्दीत ग्रॅन हार्मोनो 2, सेलिब्रिटी स्प्लॅश आणि दिवानी कॉमेडिया सारखे अनेक शो केले. (Famous actress and model Silvina Luna underwent plastic surgery and died)

अधिक वाचा-
सलमान आणि कतरिनाच्या ‘टायगर 3’चे पहिला पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
मराठी सिनेमाच्या निर्मात्याने शशांक केतकरचे थकवले लाखो रुपये; अभिनेता म्हणला, ‘योग्य क्षणी…’

हे देखील वाचा