Friday, March 14, 2025
Home अन्य पाहिलात का? उर्फी जावेदचा नवीन ड्रेस, गाणे ऐकत सुचली कल्पना अन्…

पाहिलात का? उर्फी जावेदचा नवीन ड्रेस, गाणे ऐकत सुचली कल्पना अन्…

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद नेहमी आपल्या हटके स्टाइलने लोकांचे मनोरंजन करत असेत. तिने अनेक वेळेस आपले कौशल्य दाखवून काच, दगडी, पोतं, वायर अशा अनेक वस्तूंपासून ड्रेस परिधान करुन तिने सगळ्यांनाच हैराण केले होते. आपल्या हटके अंदाजाने अनेक लोकांची मने जिंकली तर अनेकांनी तिला ट्रोल केले. मात्र, तरीही ती मागे सरकली नाही. तिने अनेकांना सडेतोड उत्तरे देऊन आपल्या फॅशल स्टइलला जपले. आज उर्फी जावेदला कोणत्याही ओळखीची गरज नाही, तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची ती एकही संधी सोडत नाही. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तुफान व्हायरल झाला आहे. आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला असेल की, आता हिने काय नवीन केलं? चला तर जाणून घेऊया की, यावेळेस उर्फीच्या नवीन व्हिडिओमध्ये तिने काय हटके केलं आहे.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिने ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये झळकली होती. आज मात्र, ती सोशल मीडियाची स्टार बनली आहे. रोज नवनवीन व्हिडिओ आणि फोटो शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रेडिओवर गाणे ऐकत असते. मात्र, यानंतर तिने असे कीही केले आहे जे पाहून सगळ्यांचे भूवया उंचावल्या आहेत. पण हे काही नवीन नाही तिने अनेकदी अशाच अतरंगी स्टइलने लोकांना हैराण केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्फीने अगोदर काळ्या आणि राखाडी रंगाचा चौकडी ब्लेजर परिधान करत रेडिओवर गाणे ऐकत असते मात्र, यानंतर तिने चक्क रेडिओची कॅसेट काढून त्यामधल्या रिळचा स्टइलिश ड्रेस बनवून परिधान करते. तिची अशी स्टाइल पाहून असे वाटत आहे की, उर्फी कधी कोणत्या वस्तूचा ड्रेस बवनवेल याची शक्यता नसते. उर्फीच्या कौशल्याचे बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटीदेखिल फॅन आहेत. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेहमी प्रमाने उर्फीच्या व्हिडिओवर अनेकांनी कौतुक केले आहे तर काहींनी ट्रोल केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॉमेडियन सुदेश लहरीचा जीवन प्रवास, इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी केला होता ‘या’ कठीण परिस्थितीचा सामना
वयाच्या 46 व्या वर्षीही तितकीच फिट आहे पूजा, आजही ‘इतक्या’ प्रचंड संपत्तीची आहे मालकिण

हे देखील वाचा