Friday, April 19, 2024

वयाच्या 47व्या वर्षीही तितकीच फिट आहे पूजा, आजही ‘इतक्या’ प्रचंड संपत्तीची आहे मालकिण

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री पुजा बत्रा भलेही रुपेरी पडद्यापासून दूर आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. पुजा बत्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो देखील खूप व्हायरल होत असतात, ज्यामुळे पुजा चर्चेत असते. ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. पुजा बत्रा शुक्रवारी(27 ऑक्टोबर) आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

उत्तर प्रदेशातील 27ऑक्टोबर 1976 रोजी फैजाबाद येथे जन्मलेल्या पुजाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.1993 मध्ये मिस इंडिया ब्युटी पुरस्कार जिंकल्यानंतर तिने मिस इंटरनॅशनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तेव्हापासून पुजाचे नाव भारतातील टॉप मॉडेल्समध्ये घेतले जाऊ लागले. पुजापूर्वी तिची आई देखील मिस इंडिया स्पर्धेचा भाग राहिली आहे. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये पुजाने 250 हून अधिक शो आणि जाहिरात मोहीम केल्या आहेत.

पुजा वयाच्या ४५ व्या वर्षीही एकदम फिट आहे. ती अनेकदा तिच्या जिमचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पुजाला योगा देखील करायला आवडतो. फिटनेसबाबत ती नेहमीच जागरूक असते.

केली आहेत दोन लग्न
पुजा बत्राने दोन लग्न केले आहेत. 2002 मध्ये तिचे पहिले लग्न सर्जन सोनू अहलुवालियासोबत झाले होते. पण दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर पुजाने अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केले.

‘विरासत’ चित्रपटातून केले पदार्पण
सध्या ती पती आणि कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत आहे. पुजा बत्राने 1993 साली फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा ताज पटकावला आहे. तिने दीर्घकाळ जाहिरातींसाठीही काम केले आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता अनिल कपूर आणि तब्बू यांच्या ‘विरासत’ या चित्रपटात पुजा पहिल्यांदा दिसली होती.

३० हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम
साल 1997 पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पुजाने 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘हसीना मान जायेगी’, ‘भाई’, ‘चंद्रलेखा’, ‘मेघम’, ‘कही प्यार ना हो जाए’ या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. 2006 मध्ये तिला ‘ताज महल – एन इंटरनल लव स्टोरी’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. त्याचवेळी, 2016 मध्ये तिला ‘मिरर गेम’साठी नेवार्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन देखील मिळाले होते.

पुजा बत्राची संपत्ती
एका यशस्वी प्रॉडक्शन हाऊसची मालकीण आणि अनेक एन्डॉर्समेंट डील असल्याने पुजाकडे सध्या पैशांची कमतरता नाही. मार्च 2019 च्या आयडल नेटवर्कनुसार, पूजाची एकूण संपत्ती $ 77 मिलियनच्या जवळपास आहे.

हेही नक्की वाचा-
तापसी पन्नू-स्वरा भास्करला का म्हटलं होतं ‘बी ग्रेड’? अखेर कंगनाने सांगितलं कारण; म्हणाली…
कॉमेडियन सुदेश लहरीचा जीवन प्रवास, इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी केला होता ‘या’ कठीण परिस्थितीचा सामना

हे देखील वाचा