Friday, December 8, 2023

सलमानसाेबत दिसणारा हा चिमुरडा आहे तरी काेण? आज आहे बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता

बॉलिवूड सेलेब्स अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. बी-टाऊनचे असे अनेक मोठे स्टार्स आहेत, ज्यांचे जुने फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्याचबरोबर साेशल मीडिया युजर्स देखील या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करतात. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच एका फोटोबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

हा फोटो एकदा बॉलिवूडच्या भाईजानने म्हणजेच सलमान खान (salman khan) याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. अभिनेत्याने शेअर केलेला हा फोटो बराच जुना आहे. या फोटोंमध्ये सलमान खान खूपच तरुण दिसत आहे, तर त्याच्यासाेबत एक लहान मूल देखील अभिनेत्याच्या कुशीत बसलेला दिसत आहे.

फाेटाेत दिसणारा हा मुलगा आजचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. या अभिनेत्याने 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्या चित्रपटाची निर्मीत स्वत: भाईजान म्हणजेच सलमान खानने केली होती. आज हा अभिनेता 34 वर्षांचा असून बाॅलिवूडचा सर्वात स्मार्ट दिसणाऱ्या अभिनेत्यापैंकी एक आहे. त्याचबरोबर या अभिनेत्याचे नाव सलमान खान स्टारर चित्रपट ‘दबंग’ ची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबतही जोडले गेले आहे. दोघांच्या डेटींगच्या अफवा अनेकवेळा समोर आल्या आहेत. मात्र, अद्याप दोघांनीही त्यांच्या अफेअरच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिनेता 2022 मध्ये सोनाक्षी आणि हुमा कुरेशी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘डबल एक्सएल’ मध्ये देखील दिसला होता.

मंडळी, तुम्ही आतापर्यंत देखील या अभिनेत्याला ओळखले नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला या अभिनेत्याचे नाव सांगताे. या फोटोमध्ये सलमान खानच्या मांडीवर दिसणारा मुलगा दुसरा कोणी नसून झहीर इक्बाल (zaheer iqbal) आहे. होय, 2019 मध्ये झहीरने ‘नोटबुक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. झहीर सलमान खानच्या खूप जवळचा असून त्यांचा बाॅंड देखील खूप स्ट्राॅंग आहे.(bollywood zaheer iqbal childhood photo goes viral with bollywood actor salman khan on internet know about his first film notebook )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्याची शूटिंग केल्यानंतर ‘या’ करण्यासाठी रात्रभर रडल्या होत्या स्मिता पाटील

‘मी खरंच माफी मागतो’ देवमाणूस फेम एकनाथ गीते यांची ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा