Thursday, November 30, 2023

दिलीप कुमार मधुबाला अधुरी प्रेमकहाणी, दिलीप कुमार यांची ‘ही’ शेवटची इच्छाही राहिली होती अपूर्ण

दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मधुबाला (Madhubala) हे भारतीय चित्रपट जगतातील प्रतिभावान कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या दमदार अभिनयाने आणि गाजलेल्या चित्रपटांनी या कलाकारांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळेच त्यांच्या अभिनयाचे चाहते आजही पाहायला मिळतात. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या अफेअरची एकेकाळी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा होती. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या गाजलेल्या लवस्टोरीचा का किस्सा जाणून घेऊ.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे हे अफेअर जवळपास नऊ वर्षे चालले पण लग्नाआधीच त्यांचे मार्ग वेगळे झाले. वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराशी झुंज देत मधुबालानेही या जगाचा कायमचा निरोप घेतला. दिलीप कुमारसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मधुबालाने गायक आणि अभिनेता किशोर कुमारसोबत लग्न केले होते.मात्र, मधुबालाची बहीण मधुर भूषण यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतरही तिचे पहिले प्रेम म्हणजेच दिलीप कुमार यांना कधीही विसरू शकली नाही. मधुबालाला सुरुवातीला मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांचा आजार लक्षात आला. दिलीप कुमार त्यांना भेटण्यासाठी येथे आले होते. मधुबालाचे लग्न झाले नव्हते तेव्हा ही गोष्ट घडली होती.

दिलीप कुमार यांनी मधुबालाला सांगितले की, आम्ही पुन्हा एकत्र काम करू. मात्र, त्यानंतर मधुबालाने किशोर कुमारसोबत लग्न केले, त्यानंतर दिलीप साहब आणि मधुबाला यांची कधीच भेट झाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मधुबालाचा शेवटचा काळ अत्यंत एकाकीपणात गेला होता. मधुबालाच्या मृत्यूनंतर दिलीप कुमारही स्मशानात पोहोचले होते, पण अभिनेत्रीला पाहण्यापूर्वीच त्यांना दफन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
म्हणून तुटलं होतं दिलीप कुमार अन् मधुबालाचं नातं, थेट कोर्टात दिली अभिनेत्रीविरुद्ध साक्ष
एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, १३ वर्षे…

हे देखील वाचा