बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘दबंग‘ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनाक्षीने आतापर्यंत सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेअरबद्दल खुलेपणाने सांगितले.
रीना राॅय (reena roy) आणि शत्रुघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांच्याविषयी बोलताना सोनाक्षी (sonakshi sinha) म्हणाली, ‘मला वाटतं, माझा जन्मही जेव्हा झाला नव्हता तेव्हापासून याची सुरुवात झाली होती.’ अभिनेत्रीने सांगितले की, ‘जेव्हा ती मोठी होत होती तेव्हा तिला याची माहिती मिळाली.’ आपल्या वडिलांबद्दल बोलताना साेनाक्षी म्हणाली, ‘त्यांनी अनेक वर्षांपूर्वी जे केले त्यासाठी त्यांना आता सुळावर चढवले जाऊ शकत नाही.’ अभिनेत्रीच्या मते, ‘प्रत्येकाचा भूतकाळ असतो, तिच्या वडिलांचाही भूतकाळ आहे.’ त्याचवेळी जेव्हा तिला मुलाखतीत विचारण्यात आले की, ‘तिचा चेहरा रीनाशी खूप जुळतो.’ यावर सोनाक्षी म्हणाली, ‘माझा चेहरा माझी आई पूनम सिन्हा (poonam sinha) यांच्यासारखा आहे.’ या दोघांमधील साम्य तिने स्पष्टपणे नाकारले.
View this post on Instagram
असाच प्रश्न रीना रॉय यांना एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हा निव्वळ योगायोग असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘कधीकधी असे घडते.’
View this post on Instagram
सोनाक्षी सिन्हाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती नुकतीच ‘डबल एक्सल’मध्ये दिसली हाेती. या चित्रपटात तिच्यासोबत हुमा कुरेशीही होती. मात्र, हा चित्रपट लोकांना फारसा प्रभावित करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप झाला.(bolywood actress sonakshi sinha broke her silence for the first time she looks like poonam sinha not reena roy)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आली आली ‘फुलराणी’! अखेर सुबोध भावेच्या ती फुलराणी सिनेमाचा दमदार टिझर प्रदर्शित
पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’