Tuesday, June 18, 2024

आली आली ‘फुलराणी’! अखेर सुबोध भावेच्या ती फुलराणी सिनेमाचा दमदार टिझर प्रदर्शित

मागील अनेक दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये सुबोध भावेच्या फुलराणीची तुफान चर्चा सुरु होती. सुबोध भावे लवकरच त्याच्या आगामी ‘ती फुलराणी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ती फुलराणी’ नावाच्या नाटकाने आतापर्यंत रंगभूमी गाजवली. आता याच विषयावर वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. सिनेमा घोषित झाला तेव्हापासून सिनेमात ‘फुलराणी’ कोण असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. सिनेमाचे पोस्टर आल्यानंतर तर ही उत्सुकता शिगेला पोहचली होती. आता याच कोड्यावरून पडदा उठला आहे.

सुबोध भावेने नुकताच त्याच्या आगामी ‘ती फुलराणी’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला असून, यासोबतच ‘फुलराणीवरून देखील पडदा हटवला आहे. दरम्यान या टीझरमध्ये दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, सुशांत शेलार आदी मोठी दमदार कास्ट दिसत असून, फुलराणी देखील अतिशय सुंदर घेतली आहे. फुलराणी कशी असणार? कोण असणार? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. आता अखेर समोर आले आहे. या सिनेमात फुलराणी साकारणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, महाराष्ट्राच्या हास्यजत्रे मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर असणार आहे.

या टीझरमधून नुकताच प्रियदर्शिनीचा नवा लूक समोर आला आहे. यात तिचा दमदार अंदाज आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा टिझर शेअर करताना त्याने लिहिले, “दिसते जरी अल्लड, आहे मोठी शाणी, नडेल हिला जो त्याला पाजेल ही पाणी भाषा जरी रावडी गाते गोड गाणी, झगा मगा हिला बघा, आली आली ‘फुलराणी”. त्याचा हा टिझर लोकप्रिय झाला असून सहल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. मुख्य म्हणजे फुलराणीच्या भूमिकेत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरला पाहून प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसला आहे. चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा