शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘जर्सी’ हा चित्रपट गेल्या काही काळापासून कायदेशीर अडचणीत अडकला होता. रजनीश जयस्वाल नावाच्या लेखकाने चित्रपटाच्या निर्मात्यांवर स्क्रिप्ट चोरीचा आरोप केला होता. रजनीश यांनी गुन्हा दाखल करून चित्रपटाचे श्रेय देण्याची मागणी केली होती. आता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती केआर श्रीराम आणि एनआर बोरकर यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना सांगितले की, त्यांनी रजनीश जयस्वाल यांना श्रेय देण्याचा विचार करावा. आता या चित्रपटाचे निर्माते रजनीश यांना श्रेय देतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रिलीजपूर्वीच एखादा चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. (bombay hc asks shahid kapoor s jersey makers to sort issues with writer rajneesh jaiswal)
दुसरीकडे, ‘जर्सी’ची रिलीझ डेट अनेकदा बदलण्यात आली आहे. यापूर्वी, कोरोना महामारीमुळे चित्रपटाची रिलीझ डेट १४ एप्रिल करण्यात आली होती. हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीझ होण्यासाठीही तयार होता, पण चित्रपटाची रिलीझ डेट तीन दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आली. त्याच वेळी, रिलीझ डेट वाढवण्याचे कारण ‘केजीएफ २’ १४ एप्रिलला, तर ‘बीस्ट’ १३ एप्रिलला रिलीझ झाल्याचे मानले जात होते. मात्र, कायद्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे हा प्रकार घडल्याचे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले होते.
‘जर्सी’ हा याच नावाच्या एका तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर पंकज कपूरही (Pankaj Kapoor) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन गौतम तनुश्रीने केले आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून ‘जर्सी’ची वाट पाहत आहेत. हा चित्रपट २२ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा