Saturday, June 29, 2024

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

अनेकवेळा कलाकार किंवा निर्माते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यातील कोणतीही घटना असो, ती वाऱ्यासारखी सर्वत्र व्हायरल होत असते. मग लग्न आणि अफेअर या गोष्टी असतील तर काही बोलायलाच नको. असेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणारी निर्माते म्हणजे बोनी कपूर. बोनी कपूर यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. चित्रपटसृष्टीत त्यांचे मोठे योगदान आहे. बोनी कपूर गुरुवारी (11 नोव्हेंबर ) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.

 

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा जन्म 11नोव्हेंबर 1955 साली झाला. त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नो एन्ट्री’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी बनवले. त्यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीतील आहे. भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूर, मुलगा अर्जुन कपूर, मुलगी जान्हवी कपूर. अर्जुन कपूर हा बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूरचा मुलगा आहे तर जान्हवी ही दुसरी पत्नी श्रीदेवीची मुलगी आहे. त्यांना एकूण चार मुले आहेत. अर्जुन, जान्हवी, खुशी आणि अंशुला ही त्यांची मुले आहेत. बोनी कपूर यांचे पहिले लग्न 1983 मध्ये मोना यांच्याशी झाले होते. त्यांनी 1996 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर बोनी कपूर यांनी त्याच वर्षी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री श्रीदेवीशी विवाह केला. श्रीदेवी आता या जगात नाहीत. त्यांची प्रेमकहाणी सर्वत्र प्रसिद्ध होती. (Boney Kapoor birthday special : let’s know about love story of boney kapoor and shridevi)

बोनी कपूर यांनी ‘सोलहवां सावन’ या चित्रपटात श्रीदेवी यांना पाहिले आणि पहिल्याच नजरेत त्या त्यांना खूप आवडल्या होत्या. त्यानंतर त्यांना ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात त्यांचा भाऊ अनिल कपूरसोबत श्रीदेवीला घ्यायचे होते. या चित्रपटाच्या कास्टचा किस्सा देखील खूप मजेशीर आहे. ज्याचा खुलासा स्वतः बोनी कपूर यांनी त्यांच्या मुलाखतीत केला होता. बोनी कपूर यांना श्रीदेवी आवडत होत्या त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना श्रीदेवी यांना ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात घ्यायचे होते. परंतु त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा त्यांना कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्यावेळी बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या आईशी संपर्क केला. त्यावेळी त्यांच्या आईने चित्रपटासाठी 10 लाख एवढी फी मागितली. त्यावेळी त्यांनी ती रक्कम मान्य केली. एवढंच नाही तर त्यांच्या होणाऱ्या सासूला प्रभावित करण्यासाठी ते 11 लाख रुपये द्यायला देखील तयार होते.

एकदा जेव्हा श्रीदेवी यांची आई आजारी होती, तेव्हा बोनी कपूर यांनी त्यांची खूप साथ दिली होती. श्रीदेवी यांच्या आईचे आजारपण आणि निधन या दरम्यान ते दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यावेळी बोनी यांची काळजी पाहून श्रीदेवी इंप्रेस झाल्या होत्या. त्यामुळे बोनी कपूर यांनी प्रपोज केल्यावर त्यांना नाही म्हणण्याचा पर्याय नव्हता. त्यांनी1996 मध्ये लग्न केले.

परंतु संसाराच्या या महासागरत श्रीदेवी बोनी यांना एकटे सोडून गेल्या. आता बोनी कपूर त्यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्यासोबत राहतात. अर्जुन कपूर देखील अनेकवेळा त्याच्या बहिणींसोबत वेळ घालवताना दिसतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
‘उर्फीला या स्कर्टमध्ये मच्छरही चावणान नाही’, म्हणत नेटकऱ्यांनी नवीन ड्रेसची उडवली खिल्ली…व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
‘आथियाच्या अभिनयासारखीच केएल राहुलची बॅटिंग’ म्हणत, नेटकऱ्यांनी गर्लफ्रेडचीही उडवली खिल्ली…

हे देखील वाचा