Thursday, June 13, 2024

धक्कादायक! बोनी कपूर ठरले सायबर फसवणुकीचे बळी, तब्बल ‘इतकी’ रक्कम झाली लंपास

बॉलिवूड जगतातून सध्या अनेक कलाकारांना सायबर फसवणुक झाल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांंचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबतही घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोनी कपूर यांच्या बॅंक अकाउंटमधून जवळपास ३ लाख ८२ हजार इतकी मोठी रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. बोनी कपूर यांनी याबद्दलची तक्रार मुंबई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या गुन्ह्याची नोंद अंबोली पोलिस ठाण्यात झाली  आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बोनी कपूर यांच्या बॅंक खात्यातून मोठी रक्कम चोरी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याबद्दल बोनी कपूर यांना मार्च महिन्यात आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर बोनी कपूर यांनी याबद्दलची चौकशी आपल्या बॅंक अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर ते ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. आश्चर्य म्हणजे बोनी कपूर यांनी आपल्या बॅंक खात्याची कोणालाही माहिती दिली नव्हती. तसेच त्यांना अशा प्रकारे कोणताही कॉल आला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

याबद्दलची तक्रार बोनी कपूर यांनी पोलिस ठाण्यात दिली असून याबद्दलचा तपास पोलिस करत आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांची अशी फसवणूक काही पहिल्यांदाच झालेली नाही.याआधीही अनेक अभिनेत्यांच्या बॅंक खात्यात अशा प्रकारे घोळ झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.  दरम्यान बोनी कपूर हे हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय निर्माते आहेत. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘वॉंन्टेड’, ‘नो एंट्री’, ‘जुदाई’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचे हे चित्रपट आजही तुफान चर्चेत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

रितेश देशमुखने मित्रासोबत केला रोमॅंटिक डान्स पत्नी जेनेलियाची प्रतिक्रिया पाहून व्हाल थक्क

‘मला चित्रपटात काम करायचे नव्हते’ ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची नायिका मानुषी छिल्लरने केला धक्कादायक खुलासा

राखी सावंतच्या बॉयफ्रेंडने कार आणि घर दिले गिफ्ट, परंतु व्यक्त केली ‘ही’ मोठी इच्छा

 

हे देखील वाचा