साल २००५ मध्ये आलेला सलमान खानचा (Salman Khan) सुपरहिट कॉमेडी चित्रपट ‘नो एंट्री’चा सिक्वेल बनवण्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. तसेच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सलमान खानच्या वाढदिवशी सलमाननेही या ‘नो एंट्री’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. परंतु सध्या बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी एका अटीवर या चित्रपटाचा सिक्वेल निर्मिती करण्यास होकार दिल्याचा खुलासा केला आहे.
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना बोनी कपूर यांनी सांगितले की, “सलमान खानने त्यात काम करण्यास होकार दिला असल्यानेच मी ‘नो एंट्री’ चित्रपटाचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच माझ्याकडे या चित्रपटाची स्क्रिप्टसुद्धा तयार आहे. परंतु त्यात काम करायचे की, नाही हे सलमानवर सोडले होते. पण सलमानने त्याच्या वाढदिवसादिवशी हा चित्रपट करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्यास होकार दिला.” (boney kapoor reveal no entry sequel made only with salman khan)
तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “‘नो एंट्री’ चित्रपटापेक्षा या चित्रपटाचा सिक्वेल अधिक यशस्वी होईल. कारण ‘नो एंट्री में एंट्री’ या चित्रपटाची स्क्रिप्ट मागील चित्रपटापेक्षा खूपच चांगली असून, हा चित्रपट शेवटच्या चित्रपटापेक्षा १० पट अधिक मजेशीर असणार आहे.”
समोर आलेल्या बातमीनुसार, ‘नो एंट्री’ चित्रपटामध्ये सलमान खान कॅमिओ रोलमध्ये होता, तर या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तो मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे. त्यासोबत या मल्टीस्टारर चित्रपटात एक नाही तर नऊ अभिनेत्री दिसणार आहेत. या चित्रपटात कॉमेडीसोबतच ग्लॅमरचीही झलक पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनिस हा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम करणार असून, या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा –