Wednesday, June 26, 2024

लव रंजनचा सेट जळून खाक! बोनी कपूरने सांगितले आगीचे मोठे कारण

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात, प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक लव रंजन यांच्या चित्रपटाच्या सेटला शुक्रवारी (२९ जुलै) भीषण आग लागली. आगीची ज्वाळा एवढी तीव्र होती की, दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. मात्र, काही वेळाने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

असे सांगितले जात आहे की, हा त्याच चित्रपटाचा सेट आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत बोनी कपूर (Boney Kapoor) देखील या चित्रपटाचा एक भाग आहे, त्यामुळे सेटवर लागलेल्या आगीवर बोनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (boney kapoor spoke about fire on luv ranjan set in mumbai)

पेटला चित्रपटाचा सेट
बॉलिवूड दिग्दर्शक लव रंजन यांच्या या चित्रपटाच्या सेटवर दुपारी ४.२८ वाजता आग लागली. याची माहिती स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. दरम्यान, दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. बोनी यांनी सांगितले की, “आग कशामुळे लागली याबाबत सध्या माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मात्र शुक्रवारी सेटवर प्री लाइटिंगचे काम सुरू असताना, शॉर्ट सर्किटमुळे असे घडले असावे, असा माझा अंदाज आहे. अशा स्थितीत वीज पडल्याने या भीषण घटनेचे फलित झाले, असे म्हणता येईल.”

या आगीत कोणातीही जीवित हानी झाली नसली तरी, सोशल मीडियावर समोर आलेल्या काही फोटो आणि व्हिडिओंवरून मुंबईच्या अंधेरी पश्चिमेला लागलेली ही आग किती भीषण आहे, याचा सहज अंदाज लावता येतो.

सुरू होणार होते शूटिंग
याशिवाय, आज सेटवर प्री-लाइटिंगचे काम पूर्ण झाले असते, तर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर एक-दोन दिवसांत शूटिंग करणार होते. मात्र आता ते बराच काळ पुढे ढकलण्यात आल्याचे दिसत आहे. कोविडमुळे लव रंजनच्या या चित्रपटाचे शूटिंग अद्याप पूर्ण झालेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा