बोनी कपूर यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता असण्यासोबतच त्यांना अर्जुन कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांसारख्या स्टार्सचे वडील म्हणूनही ओळखले जाते. बोनी कपूर यांची मुले अर्जुन आणि जान्हवी अनेकदा त्यांच्या नात्यासाठी चर्चेत असतात. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बोनी कपूर आपल्या मुलांबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसले.
बोनी कपूर हे सिनेसृष्टीत एक महान पिता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची दिवंगत पत्नी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी यांना ज्या पद्धतीने हाताळले, त्यावरून त्यांची मुलंही अनेक प्रसंगी त्यांची प्रशंसा करताना दिसली आहेत. नुकतेच जेव्हा बोनी कपूर यांना विचारण्यात आले की ते आपल्या मुलांना नातेसंबंधांबद्दल सल्ला देतात का? या प्रश्नाच्या उत्तरात बोनी म्हणतात, ‘नाही, मी माझे निर्णय त्याच्यावर लादत नाही. ते त्यांच्या जीवनाशी संबंधित निर्णय घेण्यास मोकळे आहेत.
बोनी पुढे सांगतात, “आधी कधी कधी मला राग यायचा, पण मी अर्जुन किंवा जान्हवीला कधीच सांगितलं नाही की तू हे कर आणि तसं नाही कर. ते स्वतःच्या चुकांमधून शिकतात. मी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला तुमचे नातेसंबंध स्वतःच सांभाळावे लागतील.”
बोनी कपूर चार मुलांचे वडील आहेत. बोनी यांचा मुलगा अर्जुन कपूर याने अनेक वेळा अभिनेत्री मलायका अरोरासोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. जान्हवी आणि खुशी ‘कॉफी विथ करण’मध्ये हावभावातून त्यांच्या नात्याचा खुलासा करताना दिसल्या होत्या. आपल्या मुलांच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना बोनी म्हणतात, ‘मी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा खूप आदर करतो. ती माझी मुलं आहेत, पण त्यांना स्वतःचे आयुष्य आहे आणि ते प्रत्येक निर्णय घेण्यास मोकळे आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे अजय देवगनने केले काजोलसोबत लग्न, लग्नाच्या 25 वर्षानंतर मोठा खुलासा
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावली ‘स्वातंत्रवीर सावरकर’ चित्रपटाला हजेरी, अभिनेत्याने मानले आभार