Wednesday, June 26, 2024

‘लेक जान्हवीची श्रीदेवीशी तुलना करणे योग्य नाही’, बाेनी कपूरची लाेकांना खास विनंती

मुंबईत शनिवारी (दि. 15 ऑक्टाेबर) राेजी ‘मिली‘ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी जान्हवी कपूर आणि तिचे वडील बोनी कपूर यांच्यात जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाली. जान्हवी आईप्रमाणेच लाल साडी परिधान करून कार्यक्रमात उपस्थित हाेती. तिच्या लूकची चाहत्यांनी खूप प्रशंसा केली. पण, ट्रेलर लॉन्च दरम्यान, बोनी कपूर मुलगी जान्हवी कपूर विषयी असे काही सांगितले की, जान्हवीला तिचे वडील बोनी कपूर यांना गप्प करावे लागले. 

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान बाेनी कपूर (boney kapoor) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते लेक जान्हवी (janhvi kapoor) हिची तुलना दिवंगत पत्नी आणि अभिनेत्री श्रीदेवीशी करण्याबद्दल बाेलले. जान्हवी कपूरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “प्रत्येकाची भूमिका समजून घेण्याची आणि त्याचा एक भाग बनण्याची पद्धत वेगळी असते. श्रीदेवीचा हा एक खास यूएसपी होता.”

बोनी कपूर म्हणाले की, जान्हवीची श्रीदेवीशी तुलना करणे योग्य नाही
ते पुढे म्हणाले, “भूमिका साकारण्याऐवजी ती त्याचा एक भाग बनते आणि म्हणूनच तुम्ही तिच्या चित्रपटांमध्ये आतापर्यंत झालेली ग्रोथ पाहिली आहे. दक्षिणेत जवळपास 200 चित्रपट केल्यानंतर उत्तर भारतातील प्रेक्षकांनी श्रीदेवीला पाहिले. ती पात्राला समजून घेण्यासाठी एका विशिष्ट पातळीवर पोहोचली होती.”

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी श्रीदेवीने साऊथमध्ये केले 200 हून अधिक चित्रपट 
बोनी कपूर यांनी विनवणी केली की, “माझ्या लहान मुलीने नुकताच तिचा प्रवास सुरू केला आहे, तिची तिच्या आईच्या कोणत्याही कामाशी तुलना करू नका. श्रीदेवीचा प्रवासही छान होता, बालकलाकार म्हणून त्यांनी सुरुवात केली, पण दक्षिणेत 200 हून अधिक चित्रपट केल्यानंतर उत्तर भारतातील लोकांनी त्यांना पाहिले.”

‘मिली’ 4 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित होणार 
‘मिली’ हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट ‘हेलन’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सनी कौशल आणि मनोज पाहवा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जान्हवीचा राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या जान्हवी वरुण धवनसोबत नितेश तिवारीच्या ‘बावल’मध्ये काम करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, ‘मी तुझ्यासाठी जीव पण…’

‘मिसमॅच्ड’ फेम रोहित सराफच्या मागे धावल्या मुली, चाहत्यांपासून जीव वाचवत कलाकारांनी ठाेकली धूम

हे देखील वाचा