Thursday, April 25, 2024

जान्हवी पुन्हा पोहोचली ट्रोलर्सच्या पत्त्यावर! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

बॉलिवूड कलाकार नेहमीच आगळ्यावेगळ्या फॅशन करताना दिसतात. मात्र, यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. जान्हवी कपूर हिचाही तिच्या अशाच फॅशनमुळे ट्रोल झालीये. चला तर जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण.

झालं असं की, जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नुकतीच विमानतळाबाहेर स्पॉट झाली होती. सध्या तिचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती निळ्या डेनिम आणि फुल स्लीव्ह शर्टमध्ये दिसतेय. यावेळी तिच्या शर्टची काही बटणे उघडी होती. त्यामुळेच ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. यामुळे ती आता जोरदार ट्रोल होतेय. एका युजरने तिला झापत म्हटले की, “विमानतळावर आहेस, जिम किंवा पार्टीत नाही.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “असं वाटतंय ती बटणं लावायला विसरलीये.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या जान्हवी यामुळे चर्चेत आहे. जान्हवीच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती आगामी ‘तख्त’ आणि ‘जन गण मन’ यांसारख्या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ सिनेमाला मिळाले होते ऑस्कर पुरस्काराचे नामांकन, ठरलेला दुसरा मराठी सिनेमा
आता ‘ते’ पण दाखवू काय?, विमानतळावर पोहोचलेल्या उर्फीचा ट्रोलर्सला जबरदस्त टोला

हे देखील वाचा